गूळ तस्करीतील बैलबंडी जप्त
By admin | Published: August 3, 2015 01:07 AM2015-08-03T01:07:24+5:302015-08-03T01:07:24+5:30
अहेरी तालुक्यातील आसरअल्लीकडून तेलंगणा राज्याकडे बैलबंडीने तस्करी होत असलेला ३६ हजारांचा गूळ पोलिसांनी जप्त केल्याची घटना ...
दारू गाळण्याचा उद्देश : तेलंगणाकडे नेण्यात येत होता गूळ
आसरअल्ली : अहेरी तालुक्यातील आसरअल्लीकडून तेलंगणा राज्याकडे बैलबंडीने तस्करी होत असलेला ३६ हजारांचा गूळ पोलिसांनी जप्त केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास आसरअल्ली येथे घडली.
संजय गणपती जैनवार (३४) रा. आसरअल्ली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तेलंगणा राज्यात दारू गाळण्याच्या उद्देशाने बैलबंडीद्वारे गुळाची तस्करी होत होती. दरम्यान, आसरअल्ली पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बी. जी. खाटपे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. त्यांना गूळ भरून बैलबंडी दिसली. त्यांनी तत्काळ आरोपीला अडवून गुळासह बैलबंडी जप्त केली. सदर बैलबंडी चालकास विचारणा केली असता, सदर बैलबंडी संजय गणपती जैनवार (३४) रा. आसरअल्ली यांचे असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संजय जैनवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)