बाेगस बियाणांची कृषी अधिकाऱ्यांकडून दखलच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:13+5:302021-06-17T04:25:13+5:30
कुरखेडा येथील शेतकरी पुंडलिक निपाणे यांनी एका कृषी केंद्रातून ९ बॅग धान बियाणे खरेदी केले; मात्र या बियाणात १० ...
कुरखेडा येथील शेतकरी पुंडलिक निपाणे यांनी एका कृषी केंद्रातून ९ बॅग धान बियाणे खरेदी केले; मात्र या बियाणात १० ते १५ टक्के काळे व अपरिपक्व धान निघाले. संबंधित शेतकऱ्याने तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे यांना याबाबत माहिती दिली. हरडे यांनी यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांच्याशी संपर्क केला; मात्र त्यांनी कार्यालयात येऊन आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली. शेतकरी निपाणे व जयंत हरडे यांनी दुपारी १ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. परंतु यावेळी तालुका कृषी अधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते. अखेर एका तासाच्या प्रतीक्षेनंतर मंडळ अधिकारी संजय रामटेके यांच्याशी उपरोक्त विषयावर चर्चा करून ते परत आले. शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारींकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, त्यांची अनास्था दिसून येते. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे यांनी केली आहे.
===Photopath===
150621\0144img_20210615_173753.jpg
===Caption===
मंडळ अधिकारी संजय रामटेके यांचाशी चर्चा करताना हरडे व शेतकरी पुंडलीक निपाने