शैक्षणिक साहित्याने सजले महावाडा शाळेचे बालभवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:29+5:302021-01-22T04:33:29+5:30
गडचिराेली : शाळेतील प्रत्येक पाठ शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकता यावा, यासाठी धानाेरा तालुक्यातील महावाडा नं. १ येथील उपक्रमशील ...
गडचिराेली : शाळेतील प्रत्येक पाठ शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकता यावा, यासाठी धानाेरा तालुक्यातील महावाडा नं. १ येथील उपक्रमशील शिक्षक बापू मुनघाटे यांनी सुमारे ६३ प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून ते शाळेतील एका खाेलीत ठेवले आहे. त्याला बालभवन, असे नाव देण्यात आले असून, या बालभवनाला भेटी देणारे निरीक्षक येथील साहित्य बघून चकित हाेत आहेत. गडचिराेली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ‘फुलाेरा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत विद्यमान अध्यापन पद्धतीसाेबतच नवीन अध्यापन पद्धतीने अध्यापन करणे, नवीन शैक्षणिक साहित्याचा वापर करून कृतियुक्त शिक्षण दिले जाणार आहे. याअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा आधार घेत महावाडा नं. १ शाळेचे उपक्रमशील शिक्षक बापू मुनघाटे यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या समस्यांची उकल करण्याच्या उद्देशाने ६३ प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली. यातील काही शैक्षणिक साहित्य भिंतीला चिकटविण्यात आले आहे, तर काही शैक्षणिक साहित्य फरशीवर ठेवले आहे, तर काही साहित्य लाेंबकळत ठेवण्यात आले आहे. संपूर्ण खाेली शैक्षणिक साहित्याने सजविली आहे. काही शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठीसुद्धा दिले जाणार आहे. बालभवनातील शैक्षणिक साहित्य बघितल्यानंतर एखादे संग्रहालय वाटावे, असे वाटते.
मेंडाटाेलाचे केंद्रप्रमुख दिलीप मुप्पीडवार, फुलाेरा तालुका कमिटी सदस्य माेरेश्वर अंबादे यांनी बालभवनाचे निरीक्षण करून प्रशंसा केली. तालुक्यातील इतर शाळांनी अशा प्रकारचे बालभवन तयार करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक किशाेर धाईत, शाळा समिती अध्यक्ष माेतीराम आतला, उपाध्यक्ष माेहन मडावी, सदस्य प्रभाकर कुमाेटी, जिल्हा काेअर समितीचे सदस्य देवेंद्र लांजेवार, तालुका सदस्य गाेरखनाथ तांदळे यांनी मार्गदर्शन केले.
बाॅक्स ........
अंथरलेले वाचनालय ठरत आहे लक्षवेधक
महावाडा येथील बालभवनात दाेन प्रकारची वाचनालये आहेत. त्यामध्ये तरंगते वाचनालय व अंथरलेले वाचनालय, यांचा समावेश आहे. अंथरलेल्या वाचनालयात शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व स्वत: लिहिलेल्या गाेष्टींच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्याचबराेबर वाचनालयात दिनदर्शिका, हवामान तक्ता, हवामान आलेख, आवाजाचे खेळ, शब्दशाेध पाठी, शब्दावरून वाक्य, श्रुतलेखन, एकक, दशक तक्ते, ठिबके कार्ड, तुलनात्मक चित्र, शून्य संबाेध, सहभागी वाचन, अक्षर गट, चित्रकार गट आदी ६३ प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे.