जिल्हा बँंकेतर्फे बलकोवा बांबू व शमी झाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:17 AM2018-09-27T01:17:51+5:302018-09-27T01:19:22+5:30
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते प्रा.शेषराव येलेकर, अरूण मुनघाटे, रवींद्र म्हशाखेत्री, दादाजी राऊत, हेमंत खुणे, मदन मेश्राम, व.रा.वडपल्लीवार यांना शमी व बलकोवा बांबूचे झाड देण्यात आले.
याप्रसंगी गडचिरोली नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. बँकेच्या साधारण सभेसाठी उपस्थित झालेल्या जिल्ह्यातील ३०० च्या वर संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना बलकोवा बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. बांबू विक्रीबाबत संबंधित कंपनीशी चर्चा करून सामजस्य करार करण्यात येईल. बांबू विक्रीची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती अरविंद पोरेड्डीवार यांनी यावेळी दिली. बलकोवा (भीमा) बांबू हा तीन वर्षात ३० फुटापर्यंत वाढतो. या बांबूची शेतकºयांनी पडिक जमीन व शेतीच्या बांधावर लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, त्यादृष्टिकोनातून जिल्हा बँक कर्ज पुरवठा करण्याच्या विचारात आहे, असेही पोरेड्डीवार म्हणाले.
दसऱ्याला पूजा, गणपतीलाही प्रिय
शमी झाडाचे पाने गणपतीला वाहतात. तेलंगणा राज्यात दसºयाला ही पाने पूजेसाठी उपयोगात आणतात. सुमारे ३०० वर्षापूर्वी जोधपूरचे राजे अभयसिंग यांचे प्रतिनिधी शमीच्या झाडाच्या कत्तलीसाठी गेले असता, विष्णोई समाजातील अमृतादेवी नावाच्या मुलीने शमीच्या झाडाची कत्तल करू नका, असे म्हणत झाडाला घट्ट बिलगली. परंतु राज्याच्या सैनिकांनी तिचे शिर धडावेगळे करून शमी झाडाची कत्तल करू लागले. त्यावेळी जवळपास ८४ गावातील विष्णोई समाजातील पुरूष व महिलांनी एकत्र येऊन वृक्ष तोडण्यास मनाई करू लागले. ही गोष्ट राजे अभयसिंग यांना माहित होताच ते स्वत: विष्णोई समाजाची माफी मागून शमीच्या झाडासोबतच इतरही झाडांचे संवर्धन करण्याचे वचन दिले, अशी शमी झाडाबद्दल आख्यायीका आहे, असे अरविंद पोरेड्डीवार यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण संतुलन साधण्याचे काम विष्णोई समाजातील लोकांद्वारे करण्यात आले, असेही पोरेड्डीवार म्हणाले.