बांबूची वाहतूक करणारे वाहने नक्षलवाद्यांनी जाळले
By admin | Published: April 12, 2017 10:58 PM2017-04-12T22:58:45+5:302017-04-12T22:58:45+5:30
घोट वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील कोठरी परिसरात कक्ष क्र. ३८३ मध्ये जंगलामधून घोटकडे बांबूची वाहतूक करीत असताना बुधवारी दुपारी १.३० वाजता नक्षलवाद्यांनी वन विभागाचे
घोट (गडचिरोली) : घोट वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील कोठरी परिसरात कक्ष क्र. ३८३ मध्ये जंगलामधून घोटकडे बांबूची वाहतूक करीत असताना बुधवारी दुपारी १.३० वाजता नक्षलवाद्यांनी वन विभागाचे दोन ट्रक व खासगी ट्रॅक्टर जाळल्याची घटना घडली.
बल्लारशाह वन विभागाचे ट्रक क्र. एमएच-३४-एबी-५८६४ व ट्रक क्र. एमएच-३४-एबी-६००३ व दोन खासगी ट्रॅक्टर शासकीय कामावर बांबू वाहतुकीसाठी लावण्यात आले होते. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विठ्ठलवाडा येथील जीवन अवतारे यांचा एमएच-३४-एल-८१७१ व मारडा जिल्हा चंद्रपूर येथील मधु लखमापुरे यांचा एमएच-३३-एफ-१७२९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. हे चारही वाहने बांबू भरून घोटकडे येत असताना कोठरी गावापासून ५ किमी अंतरावर २५ ते ३० नक्षलवाद्यांनी वाहने थांबविले व या वाहनांच्या डिझल टाक्या फोडून वाहनांना आग लावली. घटनास्थळाजवळ एक ट्रॅक्टर नादुरूस्त स्थितीत होता. त्याला सुद्धा आग लावल्याची चर्चा परिसरात आहे. काही दिवसांपासून जंगलांना आगी लागत असल्याने जंगलातील बांबू व इतर लाकूड वाहतुकीसाठी वन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले होते. दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे