नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:48 PM2017-12-30T23:48:17+5:302017-12-30T23:48:31+5:30

नक्षल्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात फार मोठी बाधा निर्माण झाली आहे. त्यांचे बंधन झुगारण्यासाठी त्यांना गावात बंदी घाला, असे आवाहन भामरागडच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांनी केले.

 Ban the Naxalites to the village | नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घाला

नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घाला

Next
ठळक मुद्देअंजली राजपूत यांचे प्रतिपादन : ताडगाव येथे जनजागरण मेळावा; खेळातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : नक्षल्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात फार मोठी बाधा निर्माण झाली आहे. त्यांचे बंधन झुगारण्यासाठी त्यांना गावात बंदी घाला, असे आवाहन भामरागडच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांनी केले.
ताडगाव पोलीस मदत केंद्रातर्फे ताडगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन अंजली राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे सुनील कुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून ताडगावचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, कुरकुटे, कर्णवाड, पशुवैद्यकीय अधिकारी देव्हारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नक्षल चळवळीतील मोठ्या पदावर असलेले व्यक्ती चळवळीच्या भरवशावर कोट्यवधी रूपये कमवत आहेत. ते स्वत: शहरात राहतात. त्यांची मुले विदेशात शिकतात. सर्वसामान्य नक्षल्याला मात्र खांदावर बंदूक घेऊन जंगल फिरावे लागते. कल्लेड, गोविंदगाव यासारख्या घटनांमध्ये बंदुकधारी नक्षलवादी मारले जातात. हे आपलेच भाऊबांधव आहेत. नक्षलवादी आपल्याच लोकांमध्ये भांडणे लावून आपले हित साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नक्षल चळवळीतील फोलपणा लक्षात आल्यानंतर या चळवळीतून अनेक नक्षलवादी बाहेर पडत आहेत. त्यांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत शासनाकडून विविध लाभ दिले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. मेळाव्याला बटेली, दुडेपल्ली, बोटनफुंडी, इरकडुम्मे, कोहकापारी, हिचानगुडा, रेला, मोर्या आदी गावातील नागरिक उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, व्हॉलिबॉल, चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्या संघांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. मेळाव्याला जवळपास ४०० ते ५०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रमेश नारमवार यांनी केले.
जनजागरण मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title:  Ban the Naxalites to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.