बांधेगावची शाळा तीन दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:57 AM2018-08-09T00:57:51+5:302018-08-09T00:58:49+5:30
कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीच दखल घेतली नसल्याने बुधवारी तिसºयाही दिवशी शाळा बंद होती.
तालुक्यातील बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. अनेकदा एक शिक्षक तर कधी दोन्ही शिक्षक शाळेत गैरहजर राहत होते. अशी तक्रार पालकांनी पंचायत समितीला केली होती. परंतु पालकांच्या तक्रारची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांनीच शाळा उघडली. मात्र शिक्षक हजर नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकून पालकांनी शाळेत जाऊन पाहिले. शेवटी अनुपस्थित असलेल्या दोन्ही शिक्षकाची दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहून अखेरीस शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. तरी या गंभीर बाबींची शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.
शिक्षण विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही. परिणामी बुधवारी तिसºयाही दिवशी शाळा कुलूपबंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
दोन दिवसांचे वेतन कापणार
बांधगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गैैरहजर राहिल्याने या शिक्षकांचे दोन दिवसांचे वेतन कापले जाईल, असे जिल्हा परिषदचेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पी. उरकुडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.