बंँक कर्मचार्यांचे २४ महिन्यांचे वेतन थकीत
By admin | Published: May 20, 2014 11:38 PM2014-05-20T23:38:54+5:302014-05-20T23:38:54+5:30
गडचिरोली जिल्हा भू विकास बँक कर्मचार्यांचे मागील २४ महिन्यांपासून पगार थकीत झाले असल्याची माहिती अध्यक्ष व्ही. व्ही. मोहिते, कार्याध्यक्ष व्ही. व्ही. मोहितकर, प्रमुख कार्यवाह
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा भू विकास बँक कर्मचार्यांचे मागील २४ महिन्यांपासून पगार थकीत झाले असल्याची माहिती अध्यक्ष व्ही. व्ही. मोहिते, कार्याध्यक्ष व्ही. व्ही. मोहितकर, प्रमुख कार्यवाह बी. ए. सोनवाणे यांनी दिली आहे. राज्य शासनाने राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकेचे (भू विकास) पुनर्जिवन करण्याच्या हेतूने २००१ मध्ये विभाजन केले. राज्यातील कमकुवत जिल्हा बँकावर याचा मोठा परिणाम झाला असून त्या डबघाईस आल्या आहेत. भू विकास बँकेचे कामकाज १५ वर्षापासून पूर्णत: बंद झाले आहे. जिल्ह्याच्या वसुली यंत्रणेच्या मार्फतीने बहुतेक खाते बंद झाली असून व्यवस्थापन खर्चावर फार मोठा बोझा पडल्याने कित्येक महिन्यांपासून सेवेतील तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांचे वेतन झालेले नाहीत. कर्मचार्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबावर यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. असा जीवघेणा प्रकार राज्याच्या सहकार खात्याकडून होत असून शेतकर्यांप्रमाणेच भूविकास बँकेच्या कर्मचार्यांकडून आत्महत्येचे प्रकार घडून येत आहेत. कर्मचार्यांचे मुलांचे शिक्षण, मुलींचे शिक्षण, विवाहसारख्या महत्वपूर्ण बाबींवरदेखिल याचा परिणाम झाला आहे. एप्रिल २०१२ पासून २५ महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. अमरावती जिल्ह्यात बँक कर्मचारी राजेंद्र काळबांडे यांनी आत्महत्या केली. शासनाने तात्काळ २५ महिन्याचा पगार द्यावा, अशी मागणीही कर्मचारी संघटनेने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)