संपामुळे बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:17 AM2018-03-28T01:17:53+5:302018-03-28T01:17:53+5:30

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धानोरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत.

Bank strike due to strike | संपामुळे बँकेचे व्यवहार ठप्प

संपामुळे बँकेचे व्यवहार ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देखातेदार त्रस्त : धानोराच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धानोरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. परिणामी दूरवरून आलेल्या शेकडो खातेदारांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
सदर बँक शाखेचे संपूर्ण तालुक्यात मिळून जवळपास १० ते १५ हजार खातेदार आहेत. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना मुरूमगाव परिसरातील अनेक नागरिक या बँक शाखेत व्यवहार करण्यासाठी येत आहेत. मात्र या बँक शाखेचे शटर बंद राहत असल्याने दोन ते तीन तास प्रतीक्षा करून खातेदार परत जात आहेत. सकाळच्या सुमारास या बँकेचे कर्मचारी बँकेत येतात. मात्र आतून दार बंद करून काही वेळ बसून ते निघून जातात. खातेदारांचे कामे येथे सोमवारपासून होत नसल्याची माहिती आहे. बुधवारपर्यंत बँक कर्मचाºयांचा संप चालणार आहे. त्यानंतर गुरवारी व शुक्रवारी बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे केवळ शनिवार हा एकच दिवस या आठवड्यात बँकेचे व्यवहार करण्यासाठी खातेदारांना मिळणार आहेत.
मुरूमगाव भागात राष्टÑीयकृत बँकाँच्या शाखा नाहीत. त्यामुळे या भागातील अनेक खातेदार धानोरा येथे येऊन बँकेचे खाते उघडतात. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेशी अनेक खातेदार जुळले आहेत. मात्र कर्मचाºयांच्या संपामुळे बँकेचे व्यवहार ठप्प पडल्याने या बँकेचे खातेदार अडचणीत सापडले आहेत.

Web Title: Bank strike due to strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.