आत्मनिर्भर याेजनेला बॅंकांचा खाेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:29+5:302021-02-05T08:55:29+5:30
बाॅक्स .... कर्जाची मर्यादा वाढविण्याची गरज पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजनेंतर्गत केवळ दहा हजार रुपयांचे भांडवली कर्ज दिले जात ...
बाॅक्स ....
कर्जाची मर्यादा वाढविण्याची गरज
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजनेंतर्गत केवळ दहा हजार रुपयांचे भांडवली कर्ज दिले जात आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास व्यवसाय उभारण्यासाठी दहा हजार रुपये अतिशय कमी भांडवल झाले. यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. कर्ज कमी मात्र त्यासाठी लागणारे कागदपत्रे जास्त असल्याने अनेकांनी कर्ज घेण्यासही नकार दिला आहे.
काेट .......
व्यवसाय उभारण्यासाठी केवळ दहा हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. यासाठी आपण अर्ज केला आहे. याला आता दाेन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. मात्र अजूनपर्यंत कर्ज मिळाले नाही. नगर परिषद तसेच बॅंकेत आपण अनेकवेळा चकरा मारल्या आहेत. मात्र कर्ज मिळाले नाही.
- सुभाष खाेब्रागडे, फुटपाथविक्रेते, गडचिराेली
काेट .....
१४५ फुटपाथ विक्रेत्यांचे अर्ज बॅंकांमध्ये प्रलंबित आहेत. काही अर्जांमध्ये त्रुटी आहेत. त्या दूर केल्या जात आहेत. जेवढे अर्ज मंजूर झाले आहेत. त्या सर्वांना कर्ज मिळावे, यासाठी बॅंकांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- गणेश ठाकरे, नाेडल ऑफिसर,पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, गडचिराेली
बाॅक्स .......
तालुकानिहाय अर्ज
तालुका दाखल अर्ज मंजूर कर्ज वितरण
गडचिराेली ४२५ २८४ २५२
देसाईगंज २०३ ११६ ९१
आरमाेरी १६२ ८९ ७८
चामाेर्शी १५० ८८ ८०
कुरखेडा ५३ ३५ १९
सिराेंचा ४३ ३३ २९
काेरची १५ १३ ११
धानाेरा २८ २२ ०५
भामरागड ३३ २५ ०७
अहेरी २७ ११ ०५
एटापल्ली १२ ०८ ०१
मुलचेरा ०० ०० ००
एकूण १,१५१ ७२३ ५७८