आदिवासी तरुणांनी जाळले नक्षलींचे बॅनर, बंदचे आवाहन धुडकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 02:25 PM2019-07-28T14:25:30+5:302019-07-28T14:25:40+5:30

जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते मौजा कासनसूर मार्गावरील ताडगुडा  फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्यासाठी लावलेले बॅनर आदिवासी तरुणांनी रविवारी जाळले.

Banners of Naxals burnt by tribal youth | आदिवासी तरुणांनी जाळले नक्षलींचे बॅनर, बंदचे आवाहन धुडकावले

आदिवासी तरुणांनी जाळले नक्षलींचे बॅनर, बंदचे आवाहन धुडकावले

Next

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र (पोमके) जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते मौजा कासनसूर मार्गावरील ताडगुडा  फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्यासाठी लावलेले बॅनर आदिवासी तरुणांनी रविवारी जाळले. नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी नक्षलवाद्यांचे आवाहन धुडकावल्याने युवा वर्गात असलेला असंतोष पुन्हा एकदा दिसून आला.
मौजा ताडगुडा व मौजा कसुरवाही  येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली. यावेळी उपस्थित तरुणांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला विरोध असल्याचे तरुणांनी सांगितले. सप्ताहाच्या नावावर आदिवासी बांधवांची होत असलेली मुस्कटदाबी यापुढे आदिवासी तरुण खपवून घेणार नाही असे तरुणांनी सांगितले.
गडचिरोली पोलीस दलाने अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान 'आदिवासी विकास सप्ताह' साजरा करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन,युवकांची खेळाची आवड लक्षात घेऊन त्याबाबत पाठवपुरावा, त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करणार आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या नक्षल सप्ताहाला न जुमानता अनेक आदिवासी तरुणांनी  घराबाहेर पडून आपल्या व आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन गडचिरोली पोलीस दल ठिकठिकाणी राबवित असलेल्या 'आदिवासी विकास सप्ताहात' सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

Web Title: Banners of Naxals burnt by tribal youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.