वनखी येथे घर कोसळून बापलेक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:29 AM2019-07-31T00:29:11+5:302019-07-31T00:30:48+5:30
तालुक्यातील वनखी येथे घर कोसळून बापलेक घराच्या ढिागाऱ्याखाली दबल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ढिगाºयाखाली दबलेल्या बापलेकांना बाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील वनखी येथे घर कोसळून बापलेक घराच्या ढिागाऱ्याखाली दबल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ढिगाºयाखाली दबलेल्या बापलेकांना बाहेर काढले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
दुधराम जांभुळे (५०) व किरण जांभुळे (२२) अशी जखमींची नावे आहेत. दुधराम व किरण हे आपल्या घरी झोपले होते. दरम्यान सकाळी ६ वाजताच्या दरम्यान दुधराम जांभुळे यांच्या घराला लागून असलेला भास्कर बावणे यांचा घर जांभुळे यांच्या घरावर कोसळला. त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या दुधराम जांभुळे व त्यांचा मुलगा किरण हे दोघेही मातीच्या ढिगाºयाखाली दबल्या गेले. गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन माती उपसली. एक तासाच्या प्रयत्नानंतर दोघांनाही बाहेर काढण्यात आले. नशिब बलवत्तर म्हणून दोघेही बापलेक वाचले. दोघांनाही गंभिर दुखापत झाली आहे. दुधराम जांभुळे यांचा एक पाय निकामी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पीडितांना शासनाकडून आर्थिक मदत, घरकूल व जीवनोपयोगी साहित्य द्यावी, अशी मागणी होत आहे. कोसळण्याच्या स्थितीत घर असल्याने बावणे यांनी त्यांचे घर अगोदरच पाडणे आवश्यक होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली.
रेखेगाव व गुंडापल्लीत घर कोसळले
घोट परिसरातील रेखेगाव येथील दुर्गावाही कोलू तिम्मा यांच्या घराची अंशत: पडझड झाली. घराचे छत कोसळल्याने कवेलु, फाटे यांचे नुकसान झाले आहे. गुंडापल्ली येथील विलास नामदेव दुर्गे यांचा घराचा गोठा पावसाच्या पाण्यामुळे कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जीर्ण झालेली घरे पावसाळ्यापूर्वी पाडून टाकावी, असे आवाहन प्रशासनामार्फत केले जात असले तरी नागरिक कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे जीर्ण झालेल्या घरातही वस्ती करावे लागते.