स्क्रब टायफस आजार टाळण्यासाठी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:52 PM2018-08-30T23:52:46+5:302018-08-30T23:53:22+5:30

स्क्रब टायफस आजाराची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये या आजाराचे औषध उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर औषध तत्काळ घ्यावे, असे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी केले आहे.

Be careful to avoid scrub typhosis | स्क्रब टायफस आजार टाळण्यासाठी काळजी घ्या

स्क्रब टायफस आजार टाळण्यासाठी काळजी घ्या

Next
ठळक मुद्देजिल्हा साथरोग अधिकाऱ्यांचे आवाहन : एकलपूर गावाला भेट देऊन घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : स्क्रब टायफस आजाराची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये या आजाराचे औषध उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर औषध तत्काळ घ्यावे, असे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी केले आहे.
देसाईगंज तालुक्यातील एकलपूर येथे स्क्रब टायफास आजाराचा रूग्ण आढळून आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोडक यांनी एकलपूर या गावाला गुरूवारी भेट दिली. नागरिकांना या रोगाची लक्षणे, उपाय याबाबतही समजावून सांगितले. सध्या देशभरात रेकेटेशीयल आजाराचे तुरळक रूग्ण आढळत आहेत. यामध्ये विशेषत: स्क्रब टायफासचे प्रमाण अधिक आहे. काही रूग्णांमध्ये मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे आदी लक्षणे निदर्शनास आली आहेत. चिगर मायटस नावाच्या कीटकाद्वारे पसरणारा हा कीटकजन्य आजार आहे. बºयाच भागात हा आजार काही विशिष्ट कालावधीत दिसून येतो. झाडाझुडूपांशी वर्षभर संपर्क येणाºया भागात हा आजार वर्षभर आढळतो.
या आजारात शरीरावर ज्या ठिकाणी किडा चावला, त्या ठिकाणी लालसर पुरळ येते. त्याला इशर असे म्हटले जाते. त्यामुळे रूग्णाला थंडीवाजून ताप येतो. कोरडा खोकला राहतो. जास्त हा आजार राहिल्यास निमोनिया, मेंदूज्वर होऊन रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ४० टक्के लोकांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. रक्त चाचणी केल्यानंतर रोगाचे निदान होते व लवकर निदान झाले तर आजार हमखास आटोक्यात येतो. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसून येताच रूग्णाला तत्काळ वेळीच शासकीय रूग्णालयात दाखल करावे, असे आवाहन डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी केले आहे.
घ्यावयाची काळजी
स्क्रब टायफस आजार टाळण्यासाठी खुल्या जागेत शौचास जाऊ नये. चारा, गवत गोळा करताना पूर्ण कपडे घालावे. शेतात किंवा झाडाझुडूपात काम करून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवावे. गावात तसेच गावाच्या सभोवताल स्वच्छता ठेवावी. कचºयाचे ढिगारे नष्ट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वच शासकीय रूग्णालयांमध्ये औषधी उपलब्ध
स्क्रब टायफस या आजाराची औषधी जिल्हाभरातील सर्वच शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर रूग्णांनी खासगी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी सरकारी रूग्णालयातच जाऊन निदान व उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ. म्हशाखेत्री यांनी केले आहे. याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हशाखेत्री यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Be careful to avoid scrub typhosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.