स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:05 AM2019-01-24T01:05:37+5:302019-01-24T01:06:05+5:30

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

Be careful to make the tournament a success | स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काळजी घ्या

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काळजी घ्या

Next
ठळक मुद्देसचिन ओम्बासे यांची सूचना : क्रीडा संमेलनातील विविध समित्यांच्या सदस्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या अनुषंगाने सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या सभागृहात संमेलनासाठी गठीत केलेल्या विविध समित्यांच्या सदस्यांची सभा मंगळवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. २९ ते ३१ जानेवारी दरम्यान जिल्हा प्रेक्षागार मैदानावर होणाºया राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी जोमात सुरू आहे. यासाठी क्रीडा आयोजन, व्यवस्थापन, निवास, भोजन, दप्तर, मंच संचालन, प्रसिध्दी, आरोग्य, तक्रार निवारण, प्रमाणपत्र लेखन, साहित्य वाटप आदी समितीतील सदस्यांना संबंधित जबाबदारी नेमून दिलेली आहे. यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. ओम्बासे म्हणाले, क्रीडा संमेलनादरम्यान सर्वच कर्मचाºयांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळावी. कुठेही हलगर्जीपणा व कसूर होता कामा नये, निवास, नास्ता व भोजन व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच भोजन व पिण्याच्या पाण्यातून अनुचित प्रकार घडू नये, याची संबंधितांनी निट काळजी घ्यावी, क्रीडांगण व निवास तसेच भोजनगृहासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना त्यांनी केल्या. याप्रसंगी चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर कार्यालय अधीक्षक डी.के.टिंगुसले, विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर उपस्थित होते. सभेला सहायक प्रकल्प अधिकारी ए.आर.शिवणकर, आर.के. लाडे, वंदना महल्ले, आदिवासी विकास सहयोगी रामेश्वर निंबोळकर, सुधीर शेंडे, अनिल सोमनकर तसेच नागपूर विभागातील संबधित कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Be careful to make the tournament a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.