अवैध गर्भपात हाेणार नाही, याची दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:53+5:302021-04-02T04:38:53+5:30
अवैध गर्भपात होणार नाही, यांची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रूडे यांनी केले. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली ...
अवैध गर्भपात होणार नाही, यांची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रूडे यांनी केले.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित डाॅक्टरांना सूचना केल्या. यावेळी, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोलंके, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. भागराज धुर्वे, समिती सदस्य ॲड. संजय ठाकरे, गणेश नेते, मनोहर बेले, ॲड. तृप्ती राऊत उपस्थित होते. ॲड. तृप्ती राऊत यांनी गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान यंत्र कायदा १९९४ याविषयी कायदेशीर माहिती दिली. तसेच जिल्हयात एकूण ३३ सोनोग्राफी केंद्र असून, १८ शासकीय व १५ खासगी सोनोग्राफी केंद्र आहेत. संपूर्ण शासकीय केंद्र कार्यरत आहेत. सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी केली जाते. अवैध गर्भपात हाेत असल्यास www.amchi mulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता. माहिती देणाऱ्यास शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती दिली.