एड्सपासून दूर राहण्यासाठी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:09 AM2017-12-01T00:09:43+5:302017-12-01T00:09:58+5:30

युवक, युवतींचे लग्न जुळविताना संबंधित उपवर-वधू व त्यांचे कुटुंबीय सर्व प्रकारची माहिती घेतात, मात्र एचआयव्हीची तपासणी करीत नाही. त्यामुळे लग्नानंतरच्या जीवनात एड्सपासून धोका होऊ शकतो, .....

Be careful to stay away from AIDS | एड्सपासून दूर राहण्यासाठी काळजी घ्या

एड्सपासून दूर राहण्यासाठी काळजी घ्या

Next
ठळक मुद्देन्या. संजय मेहरे यांचे आवाहन : जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात निघाली जनजागृती रॅली

ऑनलाईन लोकमत 
गडचिरोली : युवक, युवतींचे लग्न जुळविताना संबंधित उपवर-वधू व त्यांचे कुटुंबीय सर्व प्रकारची माहिती घेतात, मात्र एचआयव्हीची तपासणी करीत नाही. त्यामुळे लग्नानंतरच्या जीवनात एड्सपासून धोका होऊ शकतो, त्यामुळे लग्नापूर्वी युवक-युवतींनी एचआयव्ही तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच रक्तदान करताना एचआयव्ही एड्सची तपासणी करावी, एड्सपासून दूर राहण्यासाठी तरूण वयात काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट व इतर व्यसनांपासून युवकांनी दूर राहिले पाहिजेत. आपल्याला दुर्धर आजार होऊ नये, यासाठी युवक, युवतींनी सतर्क राहावे, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हा सत्र न्या. संजय मेहरे यांनी केले.
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधन पथक व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त गुरूवारी सकाळी शहरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. न्या. संजय मेहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. पी.बी. पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलेजा मैंदमवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, प्रकल्प संचालक कबीर निकुरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सत्र न्या. संजय मेहरे यांनी एचआयव्ही एड्समुळे तरूण वयात असणारे धोके व त्यापासून होणारे परिणाम याबाबत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी एचआयव्ही एड्सविषयी अंधार दूर करण्यासाठी १०९७ या टोल फ्री नंबरचा वापर एचआयव्ही एड्स संबंधी सर्व माहिती मिळविण्यासाठी कसा करावा, याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी मोफत एचआयव्ही तपासणीकरिता जवळच्या आयसीटीसी सेंटरला भेट देऊन चाचणी करण्याबाबत जनतेला आवाहन केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी जिल्हा व तालुकास्तरावरील एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती पंधरवड्यात राबवियात येणाºया विविध कार्यक्रमाविषयी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य यांनी केले तर आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी मानले.
यशस्वीतेसाठी मुकेश वरदाळकर, नीलेश चोपडे, श्रीकांत मोडक, राजेश गोंडाने, किशोर रामटेके, शेषराव खोब्रागडे, राजेंद्र फटींग, धीरज इंगले, कल्पना धाबेकर, बंडू कुंभरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला रेड रिबिल क्लब गडचिरोली, एनएसएस, स्काऊड गाईड पथक व शासकीय संस्था, जिल्हा समादेश, प्राध्यापक, शिक्षक तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, शहरातील शाळांचे विद्यार्थी हजर होते.

Web Title: Be careful to stay away from AIDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.