सावधान ! तुमच्याही घरावर पडू शकते चोरांची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:38+5:30

शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी हीच संधी हेरून चोरटे घरफोडी करण्याची शक्यता असते. अशा वेळी गावाला जाणार असाल तर शेजाऱ्याला घरावर नजर ठेवण्याची प्रेमळ सूचना अवश्य करा. अन्यथा चोरटे आपला कार्यभाग उरकून निघूनही जातील, ते गावावरून परत आल्याशिवाय काही कळणार नाही. 

Be careful! Thieves can be a threat to your home | सावधान ! तुमच्याही घरावर पडू शकते चोरांची वक्रदृष्टी

सावधान ! तुमच्याही घरावर पडू शकते चोरांची वक्रदृष्टी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना काळातून सावरत असताना पहिल्यांदाच दिवाळीच्या सुट्ट्या मिळत आहे. त्यामुळे अनेकजण दिवाळी साजरी करण्यासाठी मूळ गावी किंवा कुठे पर्यटनाला जाण्याच्या तयारीत आहेत; पण असे घराला कुलूप लावून जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे; कारण कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्यास सुट्ट्यांची मजा घेण्याऐवजी ती सजा ठरण्याची शक्यता आहे.
शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी हीच संधी हेरून चोरटे घरफोडी करण्याची शक्यता असते. अशा वेळी गावाला जाणार असाल तर शेजाऱ्याला घरावर नजर ठेवण्याची प्रेमळ सूचना अवश्य करा. अन्यथा चोरटे आपला कार्यभाग उरकून निघूनही जातील, ते गावावरून परत आल्याशिवाय काही कळणार नाही. 
काेराेनाकाळ सुरू झाल्यापासून अनेक लाेक सुट्या घेऊन पर्यटनाला गेले नाहीत. गेल्यावर्षी काेराेनामुळे अनेकांच्या सुट्या घरातच गेल्या. यावर्षी मात्र सुट्यांचा पुरेपूर आनंद घेण्याच्या मन:स्थितीत अनेकजण आहेत. त्यामुळे घराला अनेक दिवस कुलूप राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेत चाेरटे घरफाेडी करण्याची शक्यता असल्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. 

दागिने घरी न ठेवलेलेच बरे
बंद घरांमध्ये चोरटे कसा प्रवेश करणार याची कल्पना आपण करू शकत नाही. अशा वेळी चोरटे घरात शिरलेच तर घरात त्यांना मौल्यवान वस्तू, दागिने मिळू नये याची दक्षता घ्या. शक्यतो दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा सुरक्षितपणे सोबत न्या.

घराला कुलूप लावून जाण्यापूर्वी...
-    घराच्या खिडक्या, सर्व दरवाजे चांगल्या पद्धतीने लावून घ्या. एखादा कोंडा किंवा ग्रिल कमजोर नाही ना, याची खात्री करा.
-    घरातील गॅस रेग्युलेटरचा कॉक बंद करा. शक्य असल्यास घराच्या दर्शनी भागातील एखादा लाईट सुरू ठेवा.
-    घराचे कुलूप मजबूत आहे याची खात्री करा. कुलूप चांगल्या दर्जाचे वापरा. कुलूप चांगल्या पद्धतीने लावले याची खात्री करा.

पोलीस वाढविणार गस्त
लोक एकीकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत असताना दुसरीकडे पोलिसांना मात्र रात्रीचे जागरण करावे लागते. चोरट्यांचा डाव साध्य होणार नाही यासाठी गडचिरोली शहरातही रात्रीची गस्त वाढविली जाणार आहे.

नागरिकांनी घराला कुलूपबंद करून जाताना शेजाऱ्याला, घराजवळच्या ओळखीच्या लोकांना कल्पना द्यावी. किती दिवसांनी परत येणार हे त्यांना माहित असल्यास ते घरावर वेळोवेळी नजर ठेवू शकतील. शिवाय घरात कोणतेही मौल्यवान दागिने ठेवू नये. दागिने घरातल्यापेक्षा लाॅकरमध्ये अधिक सुरक्षित राहतील.
- अरविंदकुमार कतलाम
पोलीस निरीक्षक, गडचिरोली

Web Title: Be careful! Thieves can be a threat to your home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर