बियाणे खरेदी करताना काळजी घ्या
By admin | Published: May 26, 2017 02:26 AM2017-05-26T02:26:58+5:302017-05-26T02:26:58+5:30
बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी
खरेदीच्या वस्तूंची पावती घ्या : जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खते, कीटकनाशके, बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावा, बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी करू नये, विक्रेत्याकडून अधिकृत पावती घ्यावी, बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, भेसळची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद व मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगविण्याच्या खात्रीसाठी पॉकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी, कमी निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री झाल्यास याबाबत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी, आपल्या तक्रारीविषयीची माहिती प्रत्यक्ष कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन, दूरध्वनीद्वारे, ई-मेल, एसएमएस यांच्याद्वारे करता येईल.
कृषी निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या मार्फतीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना केले आहे.