पतंग उडविताना सावधानता बाळगा!

By Admin | Published: January 5, 2017 01:37 AM2017-01-05T01:37:39+5:302017-01-05T01:37:39+5:30

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांत सणामुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने थाटली

Be careful when flying kites! | पतंग उडविताना सावधानता बाळगा!

पतंग उडविताना सावधानता बाळगा!

googlenewsNext

महावितरणचे आवाहन : विद्युत तारेला अडकलेले पतंग न काढण्याचा सल्ला
गडचिरोली : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांत सणामुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळता येत नाही. मात्र शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहीन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अश्यावेळी काहीजण तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा पयत्न करतात. अश्याप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते त्यामुळे अडकलेला पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर उठू शकतो. असा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचा भिषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कीट होण्याची व त्यामुळे अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो. सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाहीत तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहीत्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहीत होऊन प्राणांतिक अपघाताची दाट शक्यता आहे.
संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडवितांना पुरेपूर सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. पतंग उडविताना विशेष करून स्लॅबवरून पडण्याच्या किंवा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने अपघात झाल्याच्या घटना संक्रांतीच्या सणादरम्यान अनेक घडतात. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांनी विशेष सावधानता बाळगल्यास होणारे अपघात टाळण्यास फार मोठी मदत होईल, असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. (नगर प्रतिनिधी)

 

Web Title: Be careful when flying kites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.