आपत्ती निवारणासाठी दक्ष राहा

By admin | Published: May 19, 2017 12:15 AM2017-05-19T00:15:46+5:302017-05-19T00:15:46+5:30

आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे,

Be cautious for disaster relief | आपत्ती निवारणासाठी दक्ष राहा

आपत्ती निवारणासाठी दक्ष राहा

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : व्यवस्थापन बैठकीत सर्व यंत्रणांच्या समन्वयावर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी दिले.
गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यात जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजन तसेच आराखडा यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक सूचना केल्या.
बैठकीला जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरण केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसील कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, दुरसंचार विभाग तसेच नगरपालिका आदींनी १ जूनपासून २४ तास कार्यरत राहतील असे नियंत्रण कक्ष स्थापन करावेत तसेच आरोग्य विभागाने ७ जूनपासून याच स्वरुपाचे कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश नायक यांनी यावेळी दिले. यावेळी अनेक शक्यतांवर चर्चा करण्यात आली.

तीन वर्षात वीज कोसळून २८ जणांचा मृत्यू
सन २०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली ज्ल्ह्यिात वादळी पावसासोबत वीज कोसळण्याचे प्रकार होतात. अशा घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. अशा मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांवर वीज अटकाव यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) लावण्यासंदर्भात काम सुरु आहे.
यावर्षी बीएसएनएलच्या टॉवरची संख्या वाढली आहे. वीज कोसळण्याची अधिक तिव्रता असणाऱ्या भागातील ४८ टॉवरवर लायटनिंग अरेस्टर बसविण्यात येणार आहे, असे उपमहाव्यवस्थापक सय्यद यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीने २४६ गावांचा तुटतो संपर्क
जिल्ह्यात पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या एकूण गावांची संख्या २४६ इतकी आहे. त्यापैकी १११ गावांचा संपर्क तीन महिन्यांहून अधिक काळ राहत नाही. नद्यांना पूर आल्याने या गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे या गावांमध्ये धान्य तसेच औषध साठा करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 

Web Title: Be cautious for disaster relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.