ज्येष्ठांच्या तणावमुक्तीचे केंद्र व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:39+5:30
सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये व आमदार डॉ.देवराव होळी यांच्या विकास निधीतून तीन लाख अशा एकूण १३ लाख रुपयांच्या निधीतून सदर विरंगुळा केंद्र उभारण्यात आले.

ज्येष्ठांच्या तणावमुक्तीचे केंद्र व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आजच्या धकाधकीच्या युगात ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे अडचणीचे झाले आहे. आपल्या मुलांपासून दूर राहून त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले हे विरंगुळा केंद्र मानसिक समाधान देणारे तसेच तणावमुक्तीचे केंद्र ठरावे, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संस्था गडचिरोलीच्या वतीने स्थानिक पोटेगाव मार्गावर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यात आले. या विरंगुळा केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.देवराव होळी, नगर पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, न.प.च्या शिक्षण सभापती रितू कोलते, पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम, सभापती लता लाटकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी.एम.बर्लावार, संघटनेचे चंद्रपूर येथील प्रादेशिक अध्यक्ष विजय चंदावार, सचिव संगीडवार, देवाजी सोनटक्के आदी उपस्थित होते.
सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले.
खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये व आमदार डॉ.देवराव होळी यांच्या विकास निधीतून तीन लाख अशा एकूण १३ लाख रुपयांच्या निधीतून सदर विरंगुळा केंद्र उभारण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पांडुरंग घोटेकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.