पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:12 AM2017-09-27T00:12:22+5:302017-09-27T00:12:35+5:30
माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.
स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत देसाईगंज पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी तालुकास्तरीय पाणीगुणवत्ता कार्यशाळा पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, शेवंता अवसरे, रेवाता अलोणे, अर्चना ढोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. डी. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर केला पाहिजे, स्वच्छतेच्या सवयी पाळल्या पाहिजे, यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच शुद्ध पाणी, शुद्ध परिसर, वैयक्तिक स्वच्छता, व्यवस्थापन, पर्यावरण व पारंपारिक ऊर्जा पारदर्शकता आदी विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एच. कटरे, आरोग्य सहायक दरडमारे, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या उईके यांनी याप्रसंगी पाणीगुणवत्तेबाबत तांत्रिकदृष्ट्या मौलिक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक स्वाती लांजेवार, संचालन अर्चना बडोले यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पेशने यांनी मानले. कार्यशाळेला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्यसेवक व जलसुरक्षक हजर होते.
गोदरीमुक्त ग्राम पंचायतींचा सत्कार
सदर कार्यशाळेत हागणदारीमुक्त झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, कसारी, डोंगरगाव, विसोरा, कुरूड या ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफि देऊन सत्कार करण्यात आला.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सांगड घालून देसाईगंज तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींनी ही चळवळ प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, सुनीता मरस्कोल्हे व उमेशचंद्र चिलबुले आदींनी केले.