सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:53 AM2018-01-24T00:53:14+5:302018-01-24T00:54:17+5:30

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.

Be vigilant to prevent cyber crime | सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा

Next
ठळक मुद्देप्रशांत ठाकरे यांचे आवाहन : माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा; गडचिरोलीत सायबर पोलीस स्टेशन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.
येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या ‘सायबर गुन्हेगारी जाणीव जागृती’ कार्यशाळेत ते बोलत होते. गडचिरोली येथील पोलिसांची सायबर लॅब आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते.
बँकेचे व्यवहार आॅनलाईन पध्दतीने करताना त्यात असणारी जोखीम, तसेच एटीएमचा वापर आणि त्याबाबत घ्यावयाची खबरदारी, यासोबतच दूरध्वनीवरुन बँक ग्राहकांची होणारी फसवणूक याबाबत ठाकरे यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाव्दारे सविस्तर विवेचन केले. व्हीशींग (टेलीफोनव्दारे फसविणे), फिशिंग (आॅनलाईन बनावट साईटव्दारे फसविणे), लॉटरी फ्रॉड, तसेच विवाहविषयक साईडव्दारे फसवणूक यापासून दूर कसे राहावे, याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. मोबाईल बँकींग करताना खुल्या वायफायच्या वापरात असणारे धोके नेमकेपणाने काय आहेत, त्याचप्रमाणे वन टाइम पिन आणि पासवर्डची सुरक्षितता याबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली.
सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा व त्याबाबतच्या असणाºया महत्त्वाच्या तरतुदींबाबत पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या आरंभी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सहकार्य या कार्यशाळेस लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दैठणकर यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, स्वप्नील महल्ले यांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार उपस्थित होते.
चार महिन्यांत सायबरचे केवळ दोन गुन्हे
गडचिरोली सायबर लॅबच्या जोडीला आता सायबर पोलिस स्टेशनही सुरु झाले आहे. यात दाखल एका गुन्ह्यात शहरातील १३ जणांच्या एटीएमचा वापर करुन झालेली फसवणूक आणि त्या १५ लाख रुपयांच्या गुन्ह्यांचा घेतलेला तपास याचेही सादरीकरण राठोड यानी यावेळी केले. विशेष म्हणजे चार महिन्यांत सायबर पोलीस ठाण्यात केवळ दोन गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Web Title: Be vigilant to prevent cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.