रानमेव्याची गाेडी शहरात उरली नाममात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:48+5:302021-04-26T04:33:48+5:30

बदलत्या जीवनमानामुळे रानातील फळांची जागा आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावीपिढीला याचा गोडवा ...

The bean carts remained nominal in the city | रानमेव्याची गाेडी शहरात उरली नाममात्र

रानमेव्याची गाेडी शहरात उरली नाममात्र

Next

बदलत्या जीवनमानामुळे रानातील फळांची जागा आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावीपिढीला याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याचा ७८ टक्के भाग वनसंपदेने व्यापला आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण असून रानात बहुउपयोगी वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या वनस्पतींसह रानमेवा असलेली विविध फळे या वनात आहेत. त्यात टेंभर, चारबिया, खिरण्या, येरोण्या, काटेबोरे, विलायती चिंच, कवठ यांच्यासह अन्य जंगली फळांचा समावेश आहे. ही फळे बाजारात काही वर्षांपूर्वी विक्रीला राहत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा त्यातून बरीच मिळकत व्हायची, परंतु आता ही फळे बाजारात येणे कठीण झाले आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी या फळाकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. बाजारात विदेशातील फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाची देण असलेला रानमेवा दूर सारल्या जात आहे.

बॉक्स

औषधीयुक्त गुणधर्म

रानातील फळे मानवाच्या आरोग्यास उपयुक्त असून त्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. या फळाद्वारे जीवनसत्त्वे तथा पोषणमूल्ये मिळतात. परंतु अवैध वृक्षताेडीमुळे उपयुक्त वनस्पती नष्ट होताना दिसून येत आहेत. तेंदुपत्ता संकलनादरम्यान टेंभराच्या झाडाची पाने तोडणी करण्यासाठी फांद्या किंवा झाडच तोडून टाकले जाते तसेच अन्य फळांची झाडेही विविध कामांसाठी ताेडली जातात. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेली झाडेसुद्धा दुर्मीळ हाेत आहेत.

Web Title: The bean carts remained nominal in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.