जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 10:47 AM2022-06-23T10:47:55+5:302022-06-23T10:51:39+5:30

सम्मा दुग्गा हे गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात बकर्‍या व जनावरे चारायला गेले होते. दरम्यान अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला.

bear attack on a farmer in the forest, killing both of them while fighting with an ax | जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू

जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू

Next

एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली वनपरिक्षेत्रातील देवदा बिट हद्दीतील बटेर गावातील सम्मा होडपे दुग्गा ( वय ५५ ) या शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या झटापटीत कुऱ्हाडीने प्रतिकार करताना अस्वलाचाही मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, सम्मा हे शेतात बकर्‍या चारायला गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. त्यांनी स्वत:जवळील कुर्‍हाडीने अस्वलाचा प्रतिकार केला. यात अस्वल आणि सम्मा दोघेही ठार झाले. ही घटना बुधवारी घडली.

सम्मा दुग्गा हे गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात बकर्‍या व जनावरे चारायला गेले होते. दरम्यान अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. गावकर्‍यांनी गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यत वनविभागाला याबाबत कळविले नव्हते. याबद्दल वनपरिक्षेत्राधिकारी प्रकाश झाडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वनकर्मचार्‍यांना घटनेची माहिती घेण्याकरीता बटेर गावात पाठविले आहे.

Web Title: bear attack on a farmer in the forest, killing both of them while fighting with an ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.