आलापल्लीच्या जंगलात विजय हत्तीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:39 AM2019-03-20T00:39:05+5:302019-03-20T00:40:22+5:30

आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या तीन हत्तींपैकी विजय नावाच्या तरूण हत्तीने धुमाकूळ घातला आहे. माहुताच्याही आदेशांचे पालन तो करीत नाही. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विजयला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

The beat of elephant in the forest of Alapalli | आलापल्लीच्या जंगलात विजय हत्तीचा धुमाकूळ

आलापल्लीच्या जंगलात विजय हत्तीचा धुमाकूळ

Next
ठळक मुद्दे२२ वर्ष वय : नियंत्रणासाठी वन विभागाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या तीन हत्तींपैकी विजय नावाच्या तरूण हत्तीने धुमाकूळ घातला आहे. माहुताच्याही आदेशांचे पालन तो करीत नाही. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विजयला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आलापल्ली वन विभागात मागील ५० वर्षांपासून हत्ती कॅम्प आहेत. सद्य:स्थितीत या ठिकाणी तीन हत्ती आहेत. यातील दोन हत्ती वार्धक्याकडे पोहोचले आहेत, तर विजय नावाचा हत्ती तरूण आहे. त्याचे वय २२ वर्ष आहे.
कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शेतांमधील पिकांचे विजय मोठ्या प्रमाणात नुकसान करीत होता. त्यामुळे त्याला १० वर्षांपूर्वी पकडून आलापल्लीच्या जंगलात आणण्यात आले होते. १२ वर्षानंतर पुन्हा त्याने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी दक्षता व वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक एस.एल.बिलोरीकर, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील, वनपाल योगेश शेरेकर यांनी हत्ती कॅम्पला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बुधवारी विजयची तपासणी करण्यासाठी मार्गदर्शन घेण्याच्या उद्देशाने पशुवैद्यकीय अधिकारी रवीकांत खोब्रागडे हे ताडोबा येथे जाणार आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The beat of elephant in the forest of Alapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.