सखींनी सजविले आकर्षक मोदक व साकारल्या रांगोळ्या

By admin | Published: September 24, 2016 03:18 AM2016-09-24T03:18:51+5:302016-09-24T03:18:51+5:30

लोकमत सखी मंच धानोरा व आष्टीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Beautiful sweet and decorated rangoli decorated with sweets | सखींनी सजविले आकर्षक मोदक व साकारल्या रांगोळ्या

सखींनी सजविले आकर्षक मोदक व साकारल्या रांगोळ्या

Next

सखी मंचतर्फे कार्यक्रम : धानोरा, आष्टी येथे वन मिनीट गेम शो; लकी लेडी व विजेत्यांना बक्षीस वितरित
धानोरा/आष्टी : लोकमत सखी मंच धानोरा व आष्टीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
धानोरा सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या मोदक सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक वंदना उंदीरवाडे, द्वितीय क्रमांक अश्विनी किरंगे तर तृतीय क्रमांक नितीन नवले यांनी पटकाविला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ममता बावनथडे, द्वितीय क्रमांक माधवी खरपुरे, तृतीय क्रमांक पायल शेंडे, गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी बारसिंगे, द्वितीय क्रमांक शर्मिला भटकर तर तृतीय क्रमांक जास्वंदा सहारे यांनी पटकाविला. विविध स्पर्धेतील विजेत्या सखींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शीला भैसारे, शर्मिला मशाखेत्री, नंदा इंदुरकर, पुष्पा गोपाले, रेखा खोब्रागडे, कल्पना उईके, सुनीता मोहुर्ले, वैशाली मशाखेत्री, सुषमा मडावी, नीलिमा मडावी, सुनीता वंजारी, वैनू कुमरे, सुरेखा धारणे, इंदिरा शेंडे, सरिता मशाखेत्री, छाया सिडाम, सुशिला राऊत उपस्थित होत्या. विनोद सिडाम, आकाश मडावी, अक्षय शेंडे यांनी सहकार्य केले.
लोकमत सखी मंच आष्टीच्या वतीने स्फूर्ती गटातर्फे रविवारी येथील साई मंदिराच्या सभागृहात मोदक सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सखींनी उत्कृष्ट मोदक सजावट केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखी मंच संयोजिका प्रज्ञा फरकाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अनिता नलोडे, छाया नागुलवार, अनिता आत्राम, त्रिशीला उराडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्येयगीत व स्वागत गीत सादर करण्यात आले. मोदक सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता हिरादेवे, द्वितीय प्रणाली आकिनवार तर प्रोत्साहन बक्षीस मनीषा कुंदावार यांनी पटकाविला. वन मिनीट गेममध्ये प्रथम क्रमांक स्वाती पोरेड्डीवार, द्वितीय प्रेमा ढगले, बॉटलमध्ये रिंग टाकणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता हिरादेवे, द्वितीय क्रमांक प्रवीणा नागुलवार यांनी पटकाविला. लकी लेडी म्हणून प्रणाली आकिनवार यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक वैशाली इंगोले तर आभार संजीवनी बावणे यांनी मानले. परीक्षण प्रा. अनिता नलोडे, प्रज्ञा फरकाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वंदना पाटील, त्रिशीला उराडे, वंदना गौरकार, मंजूषा निमजे, निर्मला गौरकार, संध्या ताजणे व सखींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Beautiful sweet and decorated rangoli decorated with sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.