सखींनी घेतले सौंदर्याचे धडे
By admin | Published: July 2, 2016 01:37 AM2016-07-02T01:37:44+5:302016-07-02T01:37:44+5:30
लोकमत सखी मंच गडचिरोलीतर्फे विकास भवनात ‘सांग दर्पणा, मी कशी दिसते’ या कार्यक्रमात सखींना सौंदर्यविषयक नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण : केशरचना, त्वचेच्या काळजीबाबत दिली माहिती
गडचिरोली : लोकमत सखी मंच गडचिरोलीतर्फे विकास भवनात ‘सांग दर्पणा, मी कशी दिसते’ या कार्यक्रमात सखींना सौंदर्यविषयक नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी दहीकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सोनिया बैस, एकता वैद्य, घुगरे, पुष्पा देवकुले, किरण पवार, वर्षा पडघन, शारदा खंडागडे, अंजली वैराडकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या फोटोला हार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. ध्येयगीत सादर करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सौंदर्याची घ्यावयाची काळजी, डे मेकअप, पार्टी मेकअप, साधा मेकअप, नाईट मेकअप, केशरचना, साडी नेसण्याचे विविध प्रकार, त्वचा व रंगानुसार मेकअप, ब्युटी टिप्स देण्यात आले. केशरचना व सौंदर्यविषयक योगाचे प्रकार करून दाखविले. निक्की पार्लरच्या संचालिका माधुरी दहीकर यांनी सखींना मार्गदर्शन केले. २.३० ते ३ वाजतापर्यंत येणाऱ्यांमधून लकी सखी म्हणून रजनी गहाणे या प्रथम व माधुरी घुगरे यांनी द्वितीय आल्या. त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संचालन सखी मंचच्या जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम यांनी केले. आभार भारती प्रशांत खोबरागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वंदना दरेकर, पुष्पा पाठक, सुनिता उरकुडे, रागिनी कापकर, रोहिणी मेश्राम, नीळा निंदेकर, रोशनी पोरेड्डीवार, ममता हिचामी यांनी सहकार्य केले. लोकमतच्या या उपक्रमाचे सखींनी कौतुक केले. (नगर प्रतिनिधी)
घोट येथे सौंदर्याचे प्रशिक्षण
लोकमत सखी मंच घोटच्या वतीने नवोदय कॉन्व्हेंट, शांती निकेतन कॉलनी घोट येथे ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता सखींना सौंदर्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २ ते ३ वाजेपर्यंत येणाऱ्या सखींमधून लकी सखी निवडण्यात येईल. वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सखींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजिका आशा पेटकर (९४२१६६४७६३), मुमताज आसिफ सय्यद, अनिता पोरेड्डीवार यांनी केले आहे.