रोहयो कर्मचाºयांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:38 PM2017-08-14T23:38:21+5:302017-08-14T23:38:48+5:30
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी ८ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद व ठिय्या आंदोलन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी ८ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद व ठिय्या आंदोलन केले होते. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी १४ आॅगस्ट रोजी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी हे सेतू समिती अंतर्गत कार्यरत असताना केवळ गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या कर्मचाºयांची नेमणूक स्वयंसेवी संस्थेमार्फत केली जाणार आहे. त्याला सर्व कंत्राटी कर्मचाºयांचा विरोध आहे. यासाठीच त्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमदार डॉ. देवराव होळी यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन याबाबत शासनस्तरावर चर्चा करून आपण हा प्रश्न सकारात्मकपणे निकाली काढू, असे आश्वासन आंदोलकांना दिले. या आश्वासनानुसार आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी तहसीलदार दयाराम भोयर, गडचिरोलीचे ठाणेदार संजय सांगळे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक भुपेश कुळमेथे, प्रविण वाघरे, दामोधर अरिगेला उपस्थित होते.
शासनाने मागण्या मान्य न केल्यास आणखी आंदोलन सुरू करण्याचा इशारा रोहयो कर्मचाºयांनी दिला आहे.