खडू-फळा बंद आंदोलन मागे
By admin | Published: September 30, 2015 05:01 AM2015-09-30T05:01:08+5:302015-09-30T05:01:08+5:30
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथील शिक्षक कर्मचाऱ्यांचे जुलै २०१५ पासून
धानोरा : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथील शिक्षक कर्मचाऱ्यांचे जुलै २०१५ पासून शालेय प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वेतन झाले नव्हते. त्यामुळे सोमवारपासून खडू, फळा बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी आंदोलन सुरू असताना पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी कोल्हे यांनी आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन ५ आॅक्टोबरपर्यंत सर्व शिक्षकांचे वेतन देण्यात येईल व वेतनास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय प्रमुखावर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र झाडे यांच्या मार्गदर्शनात सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राजेंद्र झाडे यांच्या समावेत विभागीय कार्यवाह प्रा. दिलीप तडस, नागपूर शहर अध्यक्ष प्रा. सपन नेहरोत्रा, प्रा. किशोर वरभे, प्रा. विलास गभणे, गट शिक्षणाधिकारी रमेश उचे, प्रा. तुंगीडवार, प्रा. डांगे, पर्यवेक्षक आंबेकर, एम. एन. चलाख, कोहाडे, उके उपस्थित होते.