तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; आराेग्य प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:26 AM2021-07-18T04:26:21+5:302021-07-18T04:26:21+5:30

दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ४ हजार ५०० पर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या रुग्णांवर एकाचवेळी उपचार करताना आराेग्य यंत्रणेच्या ...

The bell of the third wave rang; Healthy administration is ready | तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; आराेग्य प्रशासन झाले सज्ज

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; आराेग्य प्रशासन झाले सज्ज

Next

दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ४ हजार ५०० पर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या रुग्णांवर एकाचवेळी उपचार करताना आराेग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले हाेते. दुसऱ्या लाटेत जवळपास ६५० नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात दुसरी लाटच सुरू आहे. मात्र दुसरी लाट संपण्यापूर्वीच तिसरी लाट येण्याचा धाेका वर्तविला जात आहे. भारतात डेल्टा रुग्णांच्या संख्येत वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. तिसरी लाटही प्राणघातक ठरण्याची शक्यता असल्याने आराेग्य विभाग सजग झाला आहे. आवश्यक त्या उपपाययाेजना करण्यास सुरूवात झाली आहे.

ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे

दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांना माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत हाेती. ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट जिल्हा रुग्णालयात बसविण्यात आला आहे. विद्युत पुरवठा व इतर कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ताे लवकरच सुरू हाेईल अशी माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा प्लांट सुरू झाल्यास आराेग्य विभागाला फार माेठा आधार ठरणार आहे.

बाॅक्स

२० टक्के बेड मुलांसाठी राखीव

गडचिराेली जिल्ह्यात २ हजार २०० पेक्षा अधिक बेड आहेत. यातील २० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ४८४ सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम असलेले बेड आहेत. तर २०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन बेडपैकी १० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

बाॅक्स

महिनाभरापासून रुग्णसंख्या १०० च्यावरच

मागील महिनाभरापासून रुग्णांची संख्या १०० ते २०० च्या जवळपासच आहे. ती १०० पेक्षा अजूनही कमी झाली नाही. काही दिवस काेराेनामुक्त हाेणाऱ्यांपेक्षा काेराेनाबाधितांची संख्या अधिक राहते. ही स्थिती मागील महिनाभरापासून कायम आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास दुसरी लाट ओसरण्याअगाेदरच तिसऱ्या लाटेलाही सुरुवात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स

पहिली लाट

एकूण रुग्ण-९०२०

बरे झालेले रुग्ण-८७३३

मृत्यू-१०२

दुसरी लाट

एकूण रुग्ण-२१४७९

बरे झालेले रुग्ण-२०८९९

मृत्यू-६४१

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

एकूण लसीकरण-३,०७,४२४

पहिला डाेस- २,५७,१५२

दुसरा डाेस-५०,२७२

Web Title: The bell of the third wave rang; Healthy administration is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.