सिरोंचातील ‘हायमास्ट’च्या सूर्यप्रकाशाला वाकुल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:35 AM2021-08-29T04:35:21+5:302021-08-29T04:35:21+5:30
शुक्रवारी दिवसा हा प्रकार अनेकांनी अनुभवला. यापूर्वीही दोन वेळा असाच प्रकार झाला होता. याउलट मंगळवारी (दि. २४) नगरातील रस्त्यांवरील ...
शुक्रवारी दिवसा हा प्रकार अनेकांनी अनुभवला. यापूर्वीही दोन वेळा असाच प्रकार झाला होता. याउलट मंगळवारी (दि. २४) नगरातील रस्त्यांवरील पथदिवे पूर्णत: बंद होते. त्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाची अहेरी-सिरोंचा ही अखेरची बस रात्री ९.३० ला सिरोंचा बसस्थानकावर पोहोचली. पावसाची रिपरिप चालू होती. पण सर्वत्र अंधार पसरलेला होता. रस्त्यावर दोन ठिकाणी मोकाट जनावरे उभी होती. त्या अंधारात एखादा अपघात झाला नाही हेच नशीब म्हणावे लागेल. तरीही नागरिकांना अंधाऱ्या रस्त्यावरून चाचपडत मार्गक्रमण करावे लागत हाेते.
एकीकडे दिवसा दिवे सुरू आणि दुसरीकडे रात्रीला अंधार, याला जबाबदार कोण? नगरपंचायत की महावितरण कंपनी, असा प्रश्न नगरवासीयांना पडत आहे. दोन्ही विभागांनी लक्ष देऊन विजेचा अपव्यय न करता योग्य वेळीच पथदिवे लावावेत, अशी नगरवासीयांची अपेक्षा आहे.
270821\0952img_20210827_135817_1.jpg
दिवसा प्रकाश मान हायमाकस चा फोटो