लाभार्थ्यांची बंंँकेत ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:22 AM2018-07-14T01:22:46+5:302018-07-14T01:23:43+5:30

आरमोरी शहरात बँक आॅफ इंडियाची शाखा पंचायत समिती कार्यालयाजवळ आहे. आरमोरी शहराची सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत ४० हजारांवर खातेदार आहेत. मात्र सदर बँकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी येथे ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.

Beneficiaries of the beneficiaries | लाभार्थ्यांची बंंँकेत ससेहोलपट

लाभार्थ्यांची बंंँकेत ससेहोलपट

googlenewsNext
ठळक मुद्देपुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव : कर्मचारी, व्यापारी व महिला ग्राहकांनाही तासन्तास करावी लागते प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहरात बँक आॅफ इंडियाची शाखा पंचायत समिती कार्यालयाजवळ आहे. आरमोरी शहराची सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत ४० हजारांवर खातेदार आहेत. मात्र सदर बँकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी येथे ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. विशेष करून शासनाच्या विविध योजनेच्या महिला लाभार्थ्यांचीही येथे ससेहोलपट होत आहे.
सदर बँक शाखा आरमोरी शहरात एका छोट्याशा भाड्याच्या इमारतीत आहे. येथे ग्राहकांसाठी प्रशस्त व्यवस्था नाही. अपुऱ्या जागेत कॅश काऊंटर, कर्ज विभाग व इतर सर्व कामांचे टेबल ठेवण्यात आले आहे. ग्राहकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. बँकेचा प्रवेशद्वारही अरूंद असल्याने ये-जा करताना ग्राहकांना एकमेकांचा धक्काही लागतो. आता पावसाळा सुरू असल्याने प्रवेशद्वाराच्या बाहेर बँकेचे खातेदार उभे राहू शकत नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एकच कॅश काऊंटर असल्याने खातेदारांची रांग प्रवेशद्वाराच्या पलिकडे असते. सदर बँकेत अधिकाºयांसह एकूण नऊ कर्मचारी आहेत.
येथे सहा अधिकारी व सहा कर्मचारी असे एकूण १२ पदे मंजूर आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील तीन पदे रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. ग्रामीण भागातूनही शेकडो खातेदार दररोज या बँक शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. मात्र त्यांनाही चार ते पाच तास काम होण्यासाठी थांबावे लागते. दूरवरून आलेल्या ग्राहकांना घरी जाण्यास सायंकाळचे ७ वाजतात. आर्थिक व्यवहार गतीने होण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुरेसे कर्मचारी नियुक्त करावे. अतिरिक्त काऊंटरची व्यवस्था करावी, शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था करावी, प्रशस्त इमारतीची व्यवस्था करावी, जेणेकरून ग्राहकांची सुविधा होईल, अशी मागणी या बँकेच्या अनेक खातेदारांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर बँक शाखेत असुविधांची ही समस्या कायम आहे. अनेक खातेदारांनी माझ्याकडे तोंडी तक्रारीही केल्या. सदर बँक शाखा ही सर्वात जुनी असल्याने ही प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यात व उन्हाळ्यात खातेदारांची गैरसोय होणार नाही. रिक्तपदे लवकर भरण्यात यावी.
- भारत बावनथडे, जिल्हा महामंत्री, भाजप, आरमोरी

Web Title: Beneficiaries of the beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.