‘ड’ संवर्गातील लाभार्थी घरकूल लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:06+5:302021-07-05T04:23:06+5:30
पंतप्रधान आवास याेजनेसाठी ‘अ’ व ‘ब’ गटात निवड केलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला. उर्वरित लाभार्थी हे ‘ड’ गटातील आहेत. ...
पंतप्रधान आवास याेजनेसाठी ‘अ’ व ‘ब’ गटात निवड केलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला. उर्वरित लाभार्थी हे ‘ड’ गटातील आहेत. ड गटातील नागरिकांची यादी ऑनलाईन करून जाॅब कार्ड मॅपिंग करण्यात आली. परंतु शासनाच्या निकषाप्रमाणे तालुक्यातील एकूण ११ हजार ६३८ लाभार्थ्यांपैकी ३,२९७ लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. शासनाने जाहीर केलेले ११ अर्ज अन्यायकारक आहेत. त्यामुळे ते रद् करावे, अशी मागणी पं.स. सभापती इचाेडकर व उपसभापती दशमुखे यांनी खा. अशाेक नेते यांच्याकडे निवेदनातून केली.
बाॅक्स
हे आहेत निकष
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषांमध्ये आधार कार्ड मॅपिंग न हाेणे, दुचाकी, चारचाकी वाहन असणे, लँडलाईन फाेन, ५० हजार रुपयांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड असणे, ५ एकर शेती अथवा अडीच एकरमध्ये दुहेरी हंगाम घेणे, कुटुंबाचे उत्पन्न १० हजार रुपये मासिक असणे, आदी बाबी किंवा निकष एखाद्या कुटुंबाला लागू झाल्यास त्या कुटुंबाला अथवा व्यक्तीला घरकुलाचा लाभ दिला जात नाही. हे निकष लक्षात घेऊन तालुक्यातील ३,२९७ लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले.
040721\04gad_1_04072021_30.jpg
खा. अशाेक नेते यांना निवेदन देताना सभापती इचाेडकर, उपसभापती दशमुखे.