पोलीस विभागाच्या आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:19 AM2018-01-07T01:19:14+5:302018-01-07T01:19:28+5:30
जनतेच्या हितासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. हे कार्य अधिक सुलभ व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आॅनलाईन सुविधांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी जागरूकपणे आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपअधीक्षक एच.एच. सेंगर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : जनतेच्या हितासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. हे कार्य अधिक सुलभ व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आॅनलाईन सुविधांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी जागरूकपणे आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपअधीक्षक एच.एच. सेंगर यांनी केले.
आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र घोनमोडे, पी.एन. बांबोळे उपस्थित होते. पोलिसांचे कार्य, गुन्ह्याचे स्वरूप, कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान बांबोळे यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ई-तक्रार नोंदणी, पाहणी, पोर्टल अॅप याबाबत माहिती दिली. शिबिराचे संचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर तर आभार प्रा. छगन मुंगमोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. मोहनलाल रामटेके, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. किशोर हजारे, प्रशांत दडमल, अवथरे, प्रेमानंद नंदेश्वर, उमेश शिंपी यांनी सहकार्य केले.