५६५ लाभार्थी शेतकऱ्यांना यंत्राचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:23 AM2019-05-09T00:23:33+5:302019-05-09T00:24:06+5:30

कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्धी शेतकरी मोहिमेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्हाभरातील एकूण ५६५ शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी यंत्राचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर लाभार्थ्यांचा समावेश आहे.

Benefits of the machine to 565 beneficiaries | ५६५ लाभार्थी शेतकऱ्यांना यंत्राचा लाभ

५६५ लाभार्थी शेतकऱ्यांना यंत्राचा लाभ

Next
ठळक मुद्देशेती व्यवसाय झाला सुलभ : उन्नत शेती समृद्धी शेती मोहिमेंंतर्गत कृषी यांत्रिकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्धी शेतकरी मोहिमेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्हाभरातील एकूण ५६५ शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी यंत्राचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर लाभार्थ्यांचा समावेश आहे.
शेती हा गडचिरोली जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय आहे. बाराही तालुक्यात मिळून दरवर्षीच्या खरीप हंगामात जवळपास दोन लाख हेक्टरवर धानपिकाची लागवड केली जाते. यासंदर्भातील नियोजन आराखडा पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाच्या वतीने मंजूर केला जातो. सततची नापिकी, पिकांवर विविध प्रकारचे रोग व इतर कारणांमुळे शेती व्यवसाय सध्या तोट्यात चालला असल्याचे अनेक शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात मशागतीच्या कामासाठी पूर्वीसारखे मजूर मिळत नाही. परिणामी शेतीची कामे लांबत आहेत. अशावेळी शासन व प्रशासनाच्या वतीने कृषी क्षेत्राला यांत्रिकीकरणाची जोड देण्यात आली. गेल्या पाच-सात वर्षांपासून जनजागृती मोहीम राबवून कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या कृषी यंत्राचा पुरवठा केला जात आहे.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात कृषी यांत्रिकीकरणावर ६३०.८९ लक्ष रुपयांचा खर्च करण्यात आला.
चार ते पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम चळवळीच्या स्वरूपात गतीने राबविण्यात आले. यावेळी शेतकºयांना प्रशिक्षण देऊन यांत्रिकीकरणाचे धडे देण्यात आले. या मोहिमेत अहेरी उपविभागासह जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी बचतगट व महिला बचतगट सहभागी झाले होते.
शासन व प्रशासनाच्या पुढाकाराने यांत्रिकीकरणाला गती देण्यात आली असून याला ग्रामीण भागातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता गावागावात ट्रॅक्टर व इतर यंत्रांची संख्या झपाट्याने वाढली आहे. धानाची कापणी, मळणी व इतर कामे शेतकरी यंत्राच्या सहाय्याने करीत आहेत. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर, दालमिल, कल्टीवेटर, मळणी यंत्र व पेरणी यंत्र आदींचे वितरण करण्यात आले आहे. अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील महिलाही आता शेतीच्या कामात यंत्राचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

सधन शेतकऱ्यांना घरगडी मिळणे दुरापास्त
१० वर्षांपूर्वी १० एकर पेक्षा अधिक शेती असलेल्या सधन शेतकऱ्यांकडे वर्षभरासाठी घरगडी म्हणून कायमस्वरूपी मजूर असायचा. वर्षभरासाठी सदर घरगड्याला काही रोख रक्कम व धान दिले जात होते. मात्र आता शेती कामासाठी अशाप्रकारचा घरगडी मिळणे दुरापास्त झाले आहे. वऱ्हाडभागात कापूस व इतर पिकांची शेती केली जाते. या शेतीकामासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून काही मोजके घरगडी न्यावे लागले आहे.
४५८ ट्रॅक्टर तर ५५ मळणी यंत्र वितरित
उन्नत शेती समृद्धी शेतकरी मोहिमेअंतर्गत एकूण ४५८ लाभार्थी शेतकºयांना ट्रॅक्टरचा लाभ देण्यात आला. १४ शेतकºयांना रोटावेटर, १९ जणांना दालमिल, १८ जणांना कल्टीवेटर, ५५ शेतकऱ्याना मळणी यंत्र वितरित करण्यात आले. एका शेतकऱ्याला पेरणी यंत्राचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या ७२, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २४० व इतर प्रवर्गातील २५१ लाभार्थी शेतकºयांना यांत्रिकीकरणाचा लाभ देण्यात आला.

Web Title: Benefits of the machine to 565 beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती