तालुक्यातील १६ वारसदारांना योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:51 PM2018-02-01T23:51:12+5:302018-02-01T23:51:31+5:30

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत चामोर्शीचे तहसीलदार ए.डी. येरचे व नायब तहसीलदार (संगायो) एस.के. बावणे यांच्या हस्ते सोमवारी १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार प्रमाणे ३ लाख २० हजार रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

Benefits of scheme to 16 heirs of taluka | तालुक्यातील १६ वारसदारांना योजनेचा लाभ

तालुक्यातील १६ वारसदारांना योजनेचा लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकरणे मंजूर : ३ लाख २० हजारांचे धनादेश प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत चामोर्शीचे तहसीलदार ए.डी. येरचे व नायब तहसीलदार (संगायो) एस.के. बावणे यांच्या हस्ते सोमवारी १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार प्रमाणे ३ लाख २० हजार रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावती व्यक्ती स्त्री किंवा पुरूष मय्यत झाल्यास त्यांच्या कुटुंबियास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रूपयांचे अनुदान मंजूर केले जाते. या योजनेअंतर्गत चामोर्शी तहसील कार्यालयाच्या वतीने जानेवारी महिन्यात १६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी तलाठ्यांकडे विहित नमून्यात अर्ज सादर करावे, असे आवाहन तहसीलदार येरचे यांनी केले आहे.
प्रत्येकी २० हजार रूपयांचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये कविता परशुराम लटारे, वर्षा मारोती आत्राम, सीमा देवू मंडल, भीवा पैंका नरोटे, शशिकला रामदास नैताम, विमल पत्रू कोसरे, किरण मोरेश्वर तोरे, सुंदरी राबीन गाईन, गीता हरीदास येरेवार, प्रभा निताई कैैय्या, निर्मला मारोती खरबनकर, शेवंता मोरेश्वर जवादे, नैना नरेश गेडाम, अर्चना गणेश कन्नाके, गीता रमेश झुरे व शशिकला सुरेश हिचामी आदींचा समावेश आहे.

Web Title: Benefits of scheme to 16 heirs of taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.