दमदार पावसाने रोवणीला वेग

By Admin | Published: July 4, 2016 01:05 AM2016-07-04T01:05:26+5:302016-07-04T01:05:26+5:30

मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

Better rains will give speed to rosemary | दमदार पावसाने रोवणीला वेग

दमदार पावसाने रोवणीला वेग

googlenewsNext

कमी मजुरीने शेतकऱ्यांना लाभ : १८ हजार हेक्टरवर होणार धानाची रोवणी
वैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाऊस असाच सुरू राहल्यास रोवणीच्या कामाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चालू खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात १८ हजार २३० हेक्टरवर धानाचा पेरा आहे. सोयाबिनचे पीक १९ हेक्टरवर घेतले जाणार आहे. तसेच तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचेही लागवड केली जाते. मात्र यामध्ये मुख्य पीक धानाचे आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने बहुतांश शेतकऱ्याने धानाचे पऱ्हे टाकले नव्हते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची वाट न बघता धानाचे पऱ्हे टाकले होते व ते आता रोवण्यायोग्य झाले होते. शेतकरी वर्ग केवळ पाऊस बरसण्याची वाट बघत होता. अशातच मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास ज्या शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पऱ्हे टाकले होते. ते पऱ्हे सुध्दा पुढील आठ दिवसात रोवणीसाठी तयार होणार आहेत. त्यामुळे इतरही शेतकरी रोवणीला सुरूवात करतील. त्यामुळे पुढील आठ दिवसात रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग प्रसन्न आहे. जेवढे लवकर धानाची रोवणी होते. तेवढी उत्पादनात वाढ होते. हा दरवर्षीचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पाऊस लागताच रोवणीला सुरूवात केली जाते. सद्य:स्थितीत कमी प्रमाणात रोवणी सुरू आहे. त्यामुळे मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अधिकची मजुरीही द्यावी लागत नाही. दिवस मोठा असल्याने व रोवणीचे काम नुकतेच सुरूवात झाल्याने मजुरांमध्ये सुध्दा उत्साह आहे. त्यामुळे कमी मजुरीत अधिक काम होत असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
वैरागड परिसरातील काही शेतकऱ्यांकडे स्वत:च्या बोड्या आहेत. त्याचबरोबर मामा तलांवाचे पाणी सुध्दा दिले जाते. त्यामुळे वैरागड परिसरातील धान पीक पाण्याअभावी सहजासहजी करपत नाही. (वार्ताहर)

शेतात गवत व पालापाचोळा तयार होतो. सदर पालापाचोळा चिखलणीच्या वेळी शेतातच गाळून टाकल्यास त्यापासून चांगले शेंद्रीय खत तयार होते. अनेक शेतकरी पालापाचोळा व धानाची तणीस जाळून टाकतात. तसे करण्याऐवजी ते जमिनीत मुरवावे, यामुळे सेंद्रीय खत तयार होते. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
- ए. एल. कटरे, तालुका कृषी अधिकारी आरमोरी

Web Title: Better rains will give speed to rosemary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.