रस्त्यावर धांगडधिंगा घालाल तर खबरदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:42 AM2021-09-23T04:42:06+5:302021-09-23T04:42:06+5:30
गडचिराेली : रस्त्यावर वाढदिवस साजरा करून दहशत निर्माण करण्याच्या घटना राज्यात माेठ्या शहरांमध्ये वाढले आहेत. अशा प्रकारच्या घटना लहान ...
गडचिराेली : रस्त्यावर वाढदिवस साजरा करून दहशत निर्माण करण्याच्या घटना राज्यात माेठ्या शहरांमध्ये वाढले आहेत. अशा प्रकारच्या घटना लहान शहरांमध्ये हाेत नसल्या तरी विविध कार्यक्रमांचा विनाकारण अतिरिक्त जल्लाेष साजरा करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार मात्र अलीकडे वाढत आहे. वाढदिवसासह अन्य कार्यक्रमांचा जल्लाेष रस्त्यावर साजरा करणाऱ्यांवर पाेलिसांचा चाप बसणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा जल्लाेष जिल्ह्यात हाेत असेल तर खबरदारी घ्यावी.
काेराेनाच्या संसर्गाची भीती असल्यामुळे शासनाने सण, उत्सव साजरे करण्यासाठी नियमावली आखून दिली आहे. त्यानुसारच धार्मिक सण तसेच उत्सव साजरे करणे आवश्यक आहे. तसेच खासगी कार्यक्रमांसाठीही काही मर्यादा आहेत. परंतु या मर्यादा व नियमांचे पालन केले जात नाही. घरातील सण, उत्सव रस्त्यावर साजरे करून माेठेपण मिरविण्याचे फॅड सुरू झाले आहे. अशा प्रकारांमुळे परिसरातील लाेकांना त्रास हाेत आहे.
विशेषत: रात्रीच्या सुमारास साजरा केल्या जाणाऱ्या अतिजल्लाेषाच्या कार्यक्रमांमुळे वाॅर्डातील नागरिकांना त्रास हाेताे. असा प्रकार आढळला व त्याची तक्रार पाेलिसांत झाल्यास संबंधित लाेकांवर कारवाई हाेऊ शकते. काेणत्या ठिकाणी काय प्रकार सुरू आहे, याबाबत पाेलिसांकडे तक्रार प्राप्त हाेताच संबंधितांवर कारवाई केली जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक कार्यक्रम टाळावे.
बाॅक्स...
अलीकडे वाढताेय ट्रेन्ड
रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करणे, डीजे वाजविणे, माेठमाेठ्यांनी गाणी वाजविणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, असे प्रकार अलीकडे वाढत असून, उच्च संस्कृतीसुद्धा मानतात.
..............
...तर गुन्हा दाखल
- रस्त्यावर वाहने उभी करून केक कापणे.
- तलवारीने केक कापून प्रदर्शन करणे.
- डीजे-गाणी लावून रस्त्यावर गाेंधळ घालणे.
- मध्यरात्री फटाके फाेडणे.
- बंदुकांसह अन्य हत्यारांचे प्रदर्शन करून नाचणे किंवा गाणी म्हणणे.
- संचारबंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेणे.
काेट...
खासगी कार्यक्रम घरीच साजरे करावे. सार्वजनिक ठिकाणी अशा कार्यक्रमांचा गवगवा करू नयेे. सामान्य माणसाने कायद्याचे याेग्य प्रकारे पालन करावे. लहान मुले व रुग्णांना आपल्या जल्लाेषामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. विनाकारण डीजे, गाणी वाजविणाऱ्यांवर मुंबई पाेलीस कायदा कलम ११० चे १७ नुसार कारवाई केली जाईल.
- अरविंद कतलाम, पाेलीस निरीक्षक, गडचिराेली