ऑनलाईन जाेडीदार शाेधताना सावधान ! हात पिवळे हाेण्याआधीच हाेते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:22+5:302021-09-16T04:45:22+5:30
शहरात घरबसल्या वधू किंवा वराचा शोध घेण्याचा ट्रेंड वाढत आहे; पण ऑनलाइन लग्न जमविताना सावधान! नाव एकाचे, फोटो एखाद्या ...
शहरात घरबसल्या वधू किंवा वराचा शोध घेण्याचा ट्रेंड वाढत आहे; पण ऑनलाइन लग्न जमविताना सावधान! नाव एकाचे, फोटो एखाद्या देखण्या तरुणाचा, पत्ता खोटा आणि सरकारी नोकरी किंवा परदेशात राहत असल्याचे प्रोफाइल तयार करून तरुणींना फसविण्याचे प्रकार सुरू आहेत. हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा होण्याचे प्रकारही अलीकडे वाढीस लागले आहेत.
बाॅक्स
अशी हाेऊ शकते फसवणूक
१) लग्न जुळवणाऱ्या संस्थांच्या दोन संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार केली जातात. विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणूक झालेल्या तरुणींमध्ये बहुतांश मुली शहरी भागातील असतात. मैत्रिणींनी ऑनलाइन मुलगा पसंत केला म्हणून तरुणी घरच्यांपुढे अशा प्रकारे लग्न जमविण्याचा हट्ट धरतात.
२) विश्वास संपादन झाल्यावर वेगवेगळी कारणे सांगून पैसे मागायचे, परदेशातून गिफ्ट पाठविले आहे. यात हिरे, दागिने, डॉलर्स आहेत. मात्र, हे गिफ्ट घेण्यासाठी तुम्हाला कस्टम ड्यूटी व इतर टॅक्स भरावे लागतील, असा बोगस कॉल येतो आणि होणाऱ्या पतीने पाठविलेल्या गिफ्टच्या नादात तरुणी लाखो रुपये गमावून बसतात.
ही घ्या काळजी
१) प्रामाणिकपणे लग्नाच्या प्रयत्नात असलेला तरुण प्रत्यक्षात भेटल्याशिवाय, कुटुंबाची ओळख आणि बोलणे झाल्याशिवाय पैशांची मागणी करू शकत नाही, हे तरुणींनी लक्षात ठेवायला हवे.
२) एखादा विवाहेच्छुक तरुण संपर्कात आला तर त्याची कल्पना कुटुंबीयांना द्या. ऑनलाईन लग्न जुळविताना काळजी घ्यायलाच हवी.
(३) विवाह जुळविणाऱ्या साइटवर मागणी आल्यास त्याची माहिती कुटुंबीयांना द्यावी. संकेतस्थळावर ओळख झालेल्या पुरुषांची प्रत्यक्ष भेटून शहानिशा करावी.
४) सोशल मीडिया, मोबाइलच्या माध्यमातून मिळालेली छायाचित्रे त्याच व्यक्तीची आहेत की नाहीत, ते पडताळून पाहायला हवे. लग्नाचे किंवा मैत्रीचे आमिष दाखवून व्यवसायात भागीदार किंवा इतर कारणे देऊन कुणी पैशांची मागणी करीत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे.