भरडकर, अमिता मडावी भाजपात
By admin | Published: January 5, 2017 01:31 AM2017-01-05T01:31:48+5:302017-01-05T01:31:48+5:30
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर व गडचिरोली पंचायत समितीच्या काँग्रेसच्या
साल्हे येथील घटना : मृतकाच्या अंत्यविधीवरून निर्माण झाला वाद; कोरची ठाण्यात तक्रार
कोरची : तालुक्यातील साल्हे येथील तुळशिराम गोटा हिडामी हा बिमारीने २ जानेवारी रोजी मरण पावला. त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार जणांना गावातील नागरिकांनी मारहाण केली. याबाबतची तक्रार लालसाय श्यामसाय उईके रा. पिपरझोरा याने कोरची पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लालसाय श्यामसाय उईके यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, लालसाय उईके, ओमप्रकाश आसाराम, गलगाम, ईश्वर नरूटी, चंदरसाय कमरो, तुळशिराम हिडामी, तिलक कुमरे हे दर रविवारी कोरची येथील चर्चमध्ये प्रार्थनेला जात होते. त्यामुळे एकमेकांची ओळख पटली होती. तुळशिराम गोडो हिडामी हा २ जानेवारी रोजी मृत्यू पावल्याची माहिती त्याचा जावई राजकुमार दुगा याने प्रार्थनेदरम्यान दिली. माहित होताच तुळशिराम हिडामी याचे अंत्यविधी करण्याकरिता लालसाय उईके, बारसू उईके, ओमप्रकाश मलगाम, ईश्वरी नरूटी, चंदरसाय कमरो तसेच फादर तिलक कुमरे हे ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता साल्हे येथे पोहोचले. गावात पोहोचल्यानंतर निजामशाहा काटेंगे याने उशिरा येण्याबाबतचे कारण विचारले असता, मृतकाचा मुलगा राजिमसाय हा आपल्या वडिलांचा अंत्यविधी समाजाच्या रितीप्रमाणे करणार असल्याचे सांगितल्यामुळे आम्ही उशिरा आल्याचे सांगितले. त्यावर निजामशाहा काटेंगे, लक्ष्मण हिडामी, झाडुराम सलामे, नवाटसिंग हिडामी व गावातील जवळपास १५ लोकांनी तुळशिराम हिडामी हा तुमच्या सोबत येशूच्या प्रार्थनेला येत होता. त्यामुळे त्याचा अंत्यविधी तुम्ही का केला नाही, त्याचे प्रेत गावातच सडवत ठेवता का, असा म्हणून लाठ्याबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत लालसाय उईके, बारसू उईके, ओमप्रकाश मलगाम, ईश्वर नरूटी, चंदरसाय कमरो, तिलक कुमरे यांना दुखापत झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून कोरची पोलिसांनी निजामशाहा काटेंगे, लक्ष्मण हिडामी, साडुराम सलामे, नवलसिंग हिडामी व इतर १५ जणांवर कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)