भामरागडातील शाळा १०० टक्के डिजिटल

By admin | Published: March 26, 2017 12:46 AM2017-03-26T00:46:10+5:302017-03-26T00:46:10+5:30

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयानुसार ३१ मार्च पूर्वी १०० टक्के शाळा डिजिटल करावयाच्या होत्या. भामरागड पंचायत समितीअंतर्गत सर्वच शाळा डिजिटल झाल्या आहेत.

Bhamraagad schools 100 percent digital | भामरागडातील शाळा १०० टक्के डिजिटल

भामरागडातील शाळा १०० टक्के डिजिटल

Next

२६ शाळा : टीव्ही, टॅबलेट व प्रोजेक्टर पोहोचलेत
भामरागड : जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयानुसार ३१ मार्च पूर्वी १०० टक्के शाळा डिजिटल करावयाच्या होत्या. भामरागड पंचायत समितीअंतर्गत सर्वच शाळा डिजिटल झाल्या आहेत.
२६ शाळांना स्मार्ट टीव्ही व १२६ टॅबलेट (प्रति पाच विद्यार्थ्यांमागे एक याप्रमाणे), १३ इंटऱ्याक्टीव प्रोजक्टर तर ज्या शाळेत विजेची सोय नाही अशा चार शाळांना सोलर किटसह साहित्य वितरित करण्यात आले. मागील शैक्षणिक सत्रात राज्यातून सर्वात प्रथम मोबाईल डिजिटल झालेला तालुका आता १०० टक्के डिजिटल झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डिजिटल चळवळ सुरू आहे. शाळांमध्ये आता डिजिटल साहित्याद्वारे अध्यापन होत आहे. यामध्ये भामरागड तालुका मागे राहू नये म्हणून गटविकास अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी गावागावात पालकांच्या सभा घेतल्या व ग्रामकोषातून शाळांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले. अबंध निधी, १४ वा वित्त आयोग, पेसा निधी यातून या कामासाठी साहित्य खरेदी करण्यात आले. लोकसहभागामुळे दुर्गम तालुका पूर्णपणे डिजिटल होऊ शकला. (तालुका प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
डिजिटल साहित्य भामरागड सारख्या तालुक्यातील शाळांमध्ये गावागावात पोहोचले. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये वाढली. ज्या विद्यार्थ्यांना साधा मोबाईल हाताळणे शक्य नव्हते ते आता स्मार्ट टीव्ही, टॅबलेट व इंटऱ्याक्टीव प्रोजेक्ट वापरू लागले आहेत.

Web Title: Bhamraagad schools 100 percent digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.