भामरागडला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:47 PM2019-05-31T23:47:34+5:302019-05-31T23:48:12+5:30
भामरागड तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बासला. या वादळात अनेक झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तर अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. बुधवारी भामरागडचा आठवडीबाजार होता. अशातच वादळ सुरू झाल्याने दुकानदार व ग्राहक यांची चांगलीच फजिती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बासला. या वादळात अनेक झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तर अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. बुधवारी भामरागडचा आठवडीबाजार होता. अशातच वादळ सुरू झाल्याने दुकानदार व ग्राहक यांची चांगलीच फजिती झाली.
तेंदूपत्त्याचा हंगाम संपल्याने बुधवारचा भामरागड येथील आठवडी बाजार चांगला भरला होता. दुपारी कडक ऊन असल्याने पावसाची शक्यता नव्हती. मात्र सायंकाळी अचानक ढग दाटून आले. काही वेळातच जोरदार वादळाला सुरूवात झाली. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट सुरू झाला. अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. काही घरांवर झाडे कोसळली. झाडे रस्त्यांवर कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक ठप्प पडली होती. तालुक्यातील कोयनगुडा, बेजुर, टेकला, कुमरगुडा, मेडपल्ली, धोडराज, झारेगुडा, गोलागुडा, आरेवाडा, हिदूर, ताडगाव, कियर, कोठी आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. ऐन पावसाळ्याच्या सुरूवातीला घरावरील छत उडाल्याने छत दुरूस्त करण्यासाठी नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे.