भारिप सर्वसामान्यांसाठी संघर्षरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:03 AM2018-02-19T00:03:21+5:302018-02-19T00:04:00+5:30
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील सर्वसामान्य व मागासवर्गीयांचे ज्वलंत प्रश्न सुटले नाही. देशातील सर्व जनतेला आवश्यक त्या सोईसुविधा समपातळीवर मिळाव्यात यासाठी भारिप-बहुजन महासंघ संघर्षरत आहे, .......
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील सर्वसामान्य व मागासवर्गीयांचे ज्वलंत प्रश्न सुटले नाही. देशातील सर्व जनतेला आवश्यक त्या सोईसुविधा समपातळीवर मिळाव्यात यासाठी भारिप-बहुजन महासंघ संघर्षरत आहे, असे प्रतिपादन भारिप बंमसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.
भारिप-बहुजन महासंघाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा स्थानिक प्रेसक्लब भवनात शनिवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोलाचे आमदार बळीराम सिरसकर, भारीपचे प्रदेश सरचिटणीस अमितभाई भूईजळ, कुशल मेश्राम, डॉ. सुरेश शेळके, प्रदेश निरिक्षक रोहिदास राऊत, बंडू नगराळे, जयदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते.
समाजातील तमाम शोषित, वंचित लोकांना सोबत घेऊन त्यांच्या हातात सत्ता देण्याचा यशस्वी प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यात केला. हा प्रयोग राज्याच्या इतर जिल्ह्यात पोहोचावा, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे संघटन वाढवावे व आगामी निवडणुकींना सामोरे जावे, असे आवाहन सोनोने यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पुणेश्वर दुधे, कुलपती मेश्राम, नासीर जुम्मन शेख, सिताराम टेंभुर्णे, डाकराम वाघमारे, माला भजगवळी उपस्थित होते. संचालन प्रा. राजन बोरकर तर आभार हंसराज बडोले यांनी मानले.