जिल्ह्यातील भोई, केवट, ढिवर समाजाला मिळणार घरकूल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 02:11 PM2024-08-26T14:11:39+5:302024-08-26T14:31:13+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : इमाबहुजन कल्याणकडे प्रस्ताव

Bhoi, Kewat, Dhiwar community of the district will get house rent? | जिल्ह्यातील भोई, केवट, ढिवर समाजाला मिळणार घरकूल?

Bhoi, Kewat, Dhiwar community of the district will get house rent?

लोकमत न्यूज नेटवर्क 
देसाईगंज :
जिल्ह्यात मोठ्या संख्येने भोई, ढिवर व गोपाळ या भटक्या जमातींचे वास्तव्य आहे. या समाजातील ४४० लाभार्थ्यांच्या घरकुलांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसह इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. जिल्हाभरात सदर समाजासाठी ४४० घरकुलांना मान्यता देण्यात आली. 


अनुसूचित जातीकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना, भटक्या जमातीतील धनगर समाजाला अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, ओबीसी समाजाकरिता मोदी आवास योजना राबविण्यात येत आहे. परंतु भटक्या जमाती ब प्रवर्गात मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास  असलेले भोई, केवट, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरमोरी तालुक्यातील ५२, देसाईगंज तालुका १००, कुरखेडा तालुका २३ लाभार्थ्यांसह जिल्ह्यातील एकूण ४४० नागरिकांनी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर केले होते. परंतु जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला तरी त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. ही बाब निदर्शनास येताच आमदार कृष्णा गजबे यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग गडचिरोली यांना प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र अर्जाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना केली. आमदार कृष्णा गजबे यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. 
 

Web Title: Bhoi, Kewat, Dhiwar community of the district will get house rent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.