पूल व अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:37 AM2021-04-04T04:37:57+5:302021-04-04T04:37:57+5:30
घोटसूर व गुंडम येथील नागरिकांना तालुका मुख्यालयात जाण्यासाठी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत हाेता. पुलाअभावी येथील रहदारी बाधित हाेत ...
घोटसूर व गुंडम येथील नागरिकांना तालुका मुख्यालयात जाण्यासाठी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत हाेता. पुलाअभावी येथील रहदारी बाधित हाेत हाेती. त्यामुळे दाेन्ही गावातील नागरिकांनी येथे पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली हाेती. या मागणीची दखल जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली. त्यानुसार पुलाचे बांधकाम मंजूर झाले. याशिवाय घोटसूर-गुंडम रस्त्याचे रखडलेले काम लवकरच सुरू हाेणार असल्याचे कंकडालवार यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच गुंडम येथे अंगणवाडी इमारतीची आवश्यकता हाेती. यासाठी नागरिकांनी मागणी केली हाेती. आता ती मागणीसुद्धा पूर्ण झाली आहे. भूमिपूजनप्रसंगी जि.प. सदस्य संजय चरडुके, आविसंचे सचिव तथा सल्लागार प्रज्ज्वल नागुलवार, सल्लागार शंकर दासरवार, घोटसूरचे सरपंच साधूजी कोरामी, माजी सरपंच शिवाजी हेडाे, कसनसूरच्या सरपंच कमल ठाकरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुनील मडावी, सदस्य विलास गावडे, सदस्य छाया कोवासे, सदस्य पुसू दुर्वा, सल्लागार प्रशांत गोडशेलवार, सदस्य प्रकाश हिडो, नीलकंठ निकोडे यांच्यासह घोटसूर, गुंडम येथील नागरिक, आविसं पदाधिकारी, कार्यकर्ते, गावपाटील व भूमिया उपस्थित हाेते.