सायकल रॅलीतून जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:51 PM2018-03-24T22:51:39+5:302018-03-24T22:51:39+5:30
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हा रूग्णालयापर्यंत शनिवारी सायकल रॅली काढून क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हा रूग्णालयापर्यंत शनिवारी सायकल रॅली काढून क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली.
नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जिल्हा रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रशांत चलाख, डॉ. अद्वय अप्पलवार, डॉ. मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, डॉ. अमित साळवे, डॉ. रूपेश पेंदाम, डॉ. धुर्र्वेे आदी उपस्थित होते.
क्षयरोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य कर्मचाºयांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. कुंभारे, डॉ. शंभरकर, डॉ. अनिल रूडे यांनी क्षयरोगाच्या उपचार पध्दतीची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन हेमके, संचालन गणेश खडसे तर आभार ज्ञानदीप गलबले यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिल चव्हाण, मनिष बोदेले, एस. व्ही. देशपांडे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.