बीडीओंकडून वैरागड ग्रा. पं. ची चौकशी

By admin | Published: September 22, 2016 02:25 AM2016-09-22T02:25:50+5:302016-09-22T02:25:50+5:30

येथील ग्रामविकास अधिकारी ए. एन. डाखरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही लेखी, तोंडी सूचना न देता मागील १५ दिवसांपासून

Bidi vairagad ga Pt Inquire about | बीडीओंकडून वैरागड ग्रा. पं. ची चौकशी

बीडीओंकडून वैरागड ग्रा. पं. ची चौकशी

Next

ग्रामसेवक गैरहजर : आर्थिक व्यवहार ठप्प
वैरागड : येथील ग्रामविकास अधिकारी ए. एन. डाखरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही लेखी, तोंडी सूचना न देता मागील १५ दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्यामुळे ग्रा. पं. ची कार्यालयीन कामे तसेच ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार होण्यास अडचण निर्माण झाली. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आरमोरीचे संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सज्जनपवार यांनी पंचायत विस्तार अधिकारी रायपुरे यांच्यासह वैरागड ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली.
या चौकशीत ८ सप्टेंबर रोजी ग्रामविकास अधिकारी डाखरे वैरागड ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत ग्रा. पं. कार्यालयात आले नाहीत, अशी माहिती वैरागडचे उपसरपंच श्रीराम अहिरकर, ग्रा. पं. सदस्य नल्लू आत्राम, संजय खंडारकर, नलिनी सहारे, पांडुरंग बावणकर यांनी बीडीओ सज्जनपवार यांना दिली. आम्ही गैरहजर राहण्याबद्दल डाखरे यांना विचारले असता, मी वरिष्ठांना माहिती देऊन सुटीवर आहे, असे सांगतात, अशी तक्रार ग्रा. पं. सदस्यांनी बीडीओंजवळ केली. डाखरे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप यापूर्वी गावकऱ्यांनी केला असून चौकशीची मागणी करण्यात आली. मात्र या संदर्भात चौकशी झाली नाही. ग्रामविकास अधिकारी डाखरे यांना नोटीस बजावून गैरहजेरीचे कारण विचारले जाईल, दोन दिवसात डाखरे हजर न झाल्यास दुसऱ्या ग्रामसेवकाला कार्यभार देण्यात येईल, असे बीडीओंनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Bidi vairagad ga Pt Inquire about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.