दुचाकींची समारोसमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:32 AM2018-03-24T01:32:08+5:302018-03-24T01:32:08+5:30
चामोर्शीवरून लखमापूर बोरीकडे जाणारी दुचाकी व विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास ....
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : चामोर्शीवरून लखमापूर बोरीकडे जाणारी दुचाकी व विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास आष्टी-घोट मार्गावरील कृषी केंद्राजवळ घडली.
सुभाष तुकाराम बारसागडे (३२) रा. लखमापूर बोरी व बप्पी राबेन बिश्वास (२१) रा. विक्रमपूर असे जखमींची नावे आहेत. लखमापूर बोरी येथील सुभाष बारसागडे हा दुधाची विक्री करून चामोर्शीवरून स्वगावी लखमापूर बोरीकडे एमएच ३३ एन ३३४८ क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. तर विरूध्द दिशेने समोरून सुजित कानाईलाल डे रा. विक्रमपूर हा एमएच ३१ डीपी ५९०३ क्रमांकाच्या दुचाकीने येत होता. कृषी केंद्राजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात सुभाष बारसागडे व बप्पी बिश्वास हे दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांनाही चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. येथून त्यांना चंद्रपूरच्या रूग्णालयात हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. चामोर्शी पोलिसांनी सुजित डे याच्या विरोधात भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार शशिकर चिचघरे करीत आहेत.