वीज नसतानाही पाठविले बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:04 AM2018-09-09T01:04:09+5:302018-09-09T01:06:45+5:30
अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरूवारी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.
अहेरी तालुकातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोरेपल्ली, कवटाराम व मिचगुंडा आणि आरेंदा ग्रामपंचायतमधील ताडगुडा व चौडमपल्ली आदी पाच गावांत वीज पुरवठा अद्यापही सुरू करण्यात आला नाही. विशेष म्हणजे पाचही गावांमध्ये यंदाच्या मे महिन्यात विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही एक दिवस सुद्धा वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांना वीज देयके पाठविले जात आहेत. महावितरण कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात रस्त्याने फिरणाºया नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, आरेंदाचे उपसरपंच राजू तलांडी तसेच कोरेपल्ली, कवटाराम, मिचगुंडा, ताडगुडा व चौडमपल्लीतील नागरिक हजर होते.
ट्रान्सफॉर्मर पडला बंद
येरमनार व आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर लावून तो सुरू करण्यात आला. परंतु वीज पुरवठा गावांमध्ये सुरळीत करण्यात आला नाही. वीज पुरवठा सुरू करण्याआधीच ट्रान्सफार्मर बंद पडले. ताडगुडा येथील अनेक नागरिकांच्या घरी वीज मीटरही बसविण्यात आले नाही. परंतु वीज पोहोचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विजेची अद्यापही प्रतीक्षा आहे. महावितरण कंपनीच्या एकूणच कारभारावर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.